Health Tips : हृदय निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीमध्ये ‘हे’ बदल करा, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होईल!

| Updated on: Jul 19, 2021 | 10:07 AM

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)च्या मते, जागतिक स्तरावर हृदयविकार मृत्यूचे मुख्य कारण आहे. अंदाजे 17.9 दशलक्ष लोक दर वर्षी यामुळे मरतात. खराब जीवनशैली आणि वेळेवर न खाण्याची सवय यामागील प्रमुख कारण आहे.

Health Tips : हृदय निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीमध्ये हे बदल करा, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होईल!
निरोगी जीवनशैली
Follow us on

मुंबई : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)च्या मते, जागतिक स्तरावर हृदयविकार मृत्यूचे मुख्य कारण आहे. अंदाजे 17.9 दशलक्ष लोक दरवर्षी यामुळे मरतात. खराब जीवनशैली आणि वेळेवर न खाण्याची सवय यामागील प्रमुख कारण आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आपण घरातच जास्त आहोत. यामुळे आपल्या कोणत्याही शारीरिक हालचाली जास्त प्रमाणात होत नाहीत. (Make these changes in your lifestyle to keep your heart healthy)

दिवसातून नऊ ते दहा तास एका ठिकाणी बसून आपण सर्वजण काम करतो. यादरम्यान आपण जंक फूड देखील मोठ्या प्रमाणात खातो आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. बरेच लोक सोशल मीडियावर आपला जास्त वेळ घालतात आणि याचाही अधिक वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही सामान्य चुकांबद्दल सांगत आहोत ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत.

ताण

तणावामुळे उच्च रक्तदाब, छातीत दुखणे, हृदयाची गती वाढणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. यामुळे हृदयाच्या स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे हृदयरोग होतो. कॉर्टिसॉलच्या उच्च पातळीमुळे, उच्च रक्तदाब, ट्रायग्लिसेराइड आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते.

धूम्रपान

जे लोक धूम्रपान करतात त्यांना कोरोनरी धमनी रोग आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो. हृदय-संबंधित प्रत्येक 5 मृत्यूंपैकी एक मृत्यू थेट धूम्रपान संबंधित आहे. जे लोक जास्त प्रमाणात धूम्रपान करतात. त्यांच्यामध्ये हृदयाचा धोका जास्त असतो.

सीडेंटरी जीवनशैली

सीडेंटरी जीवनशैली अनेक प्रकारचे रोग वाढविण्याचे कार्य करते. निरोगी हृदयासाठी, आपण दिवसातून किमान 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या हृदयरोगाशी संबंधित इतर रोगांमध्ये वाढ होण्याचे हे मुख्य कारण आहे.

बरेच तास काम करणे

दिवसातील बराच वेळ काम केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे झोपेचे विकार, मानसिक आरोग्य आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. आपण थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घ्यावी. स्ट्रेचिंग व्यायामासह. योग्य बसण्याची पध्दत आणि निरोगी अन्न खा

रात्री उशिरा झोपण्याची सवय

रात्री उशिरा झोपल्यामुळे तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर दिसून येतो. चांगल्या आरोग्यासाठी 7 ते 8 तासांची संपूर्ण झोप घ्या.

जंक फूड

जंक फूड खाल्ल्याने इन्स्ट कॅलरी आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. त्याचे सतत सेवन केल्यास वजन वाढते, तसेच उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची समस्या वाढू शकते. म्हणूनच आपण नेहमी हेल्दी आहार घेतला पाहिजे आणि बाहेरचे अन्न खाणे टाळले पाहिजेत.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Make these changes in your lifestyle to keep your heart healthy)