AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raisin Water Benefits : मनुक्याच्या पाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील!

मनुके खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे मुख्यतः मिठाई बनवण्यासाठी वापरले जाते. हे खूप चवदार असतात. चवीव्यतिरिक्त हे ड्राय फ्रूट तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. मनुक्याचे पाणी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

Raisin Water Benefits : मनुक्याच्या पाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील!
मनुक्याचे पाणी
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 11:08 AM
Share

मुंबई : मनुके खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे मुख्यतः मिठाई बनवण्यासाठी वापरले जाते. हे खूप चवदार असतात. चवीव्यतिरिक्त हे ड्राय फ्रूट तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. मनुक्याचे पाणी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत. (Raisin water is extremely beneficial for health)

तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यापासून तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मनुक्याच्या पाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. मनुका पाणी आरोग्याच्या अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. यकृताशी संबंधित समस्यांच्या उपचारासाठी हे फायदेशीर आहे. आपण घरी मनुका पाणी कसे बनवू शकता आणि ते दररोज पिण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात.

मनुक्याचे पाणी कसे बनवायचे?

2 कप पाणी आणि 150 ग्रॅम मनुके घ्या. एका पातेल्यात पाणी घालून उकळी आणा. त्या पाण्यामध्ये मनुके घाला आणि रात्रभर भिजू द्या. सकाळी हे पाणी गाळून मंद आचेवर गरम करा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. त्याचे नियमित सेवन करा.

मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे

यकृत

मनुक्याचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातून सर्व हानिकारक विष बाहेर काढण्यास मदत होते. हे रक्त शुद्ध करण्यात मदत करते. हे आपले यकृत सहजपणे डिटॉक्स करते.

आम्ल नियंत्रित करते

जर तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर मनुक्याचे पाणी पिणे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. हे पाणी तुमच्या पोटातील आम्ल नियंत्रित करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

मनुक्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मनुक्याचे पाणी तुमच्या आहाराचा समाविष्ट करू शकतात.

हृदयाचे आरोग्य राखते

मनुक्याचे पाणी तुमचे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे तुमच्या शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

कर्करोग प्रतिबंधित करते

मनुक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Raisin water is extremely beneficial for health)

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा