स्वयंपाकघरातील तेलकट,चिकट झालेली फरशी काही सेकंदात करा स्वच्छ, ‘ही’ पद्धत करेल काम

स्वयंपाकघरात काम करताना, कधीकधी आजूबाजूच्या फरशीवर खूप चिकट होते किंवा त्यावर जेवण बनवताना फोडणीचा किंवा इतर पदार्थांचा तेलकट हट्टी डागामुळे फरशीवर चिकटपणा येऊ लागतो, जो साफ करणे खूप कठीण असते. तर या काही सोप्या टिप्स फॉलो करून फरशी काही मिनिटातच स्वच्छ होईल. चला तर मग जाणून घेऊयात...

स्वयंपाकघरातील तेलकट,चिकट झालेली फरशी काही सेकंदात करा स्वच्छ, ही पद्धत करेल काम
Kitchen dirty and sticky floor Clean in minutes know the hacks
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 24, 2025 | 1:05 AM

स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्वाचे ठिकाण आहे, कारण येथे सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक पदार्थ तयार केले जातात. अशातच जर स्वयंपाकघरात डाळीच्या व भाज्यांच्या फोडणीचे तेलकटपणा आसपासच्या फरशीवर जमा होतात. त्यामुळे स्वयंपाकघरात घाण असेल तर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. त्यातच प्रत्येकजण आपले स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच आजही बहुतेक महिला घरातील कामे करताना स्वयंपाकघरात बराच वेळ घालवतात. जरी आधुनिक काळात अनेक प्रकारचे स्वयंपाकघरातील उपकरणे आली आहेत आणि स्वयंपाक करणे सोपे झाले आहे, परंतु स्वयंपाकघरात फक्त अन्न शिजवावे लागत नाही, तर त्यानंतर स्वयंपाकघर देखील स्वच्छ करावे लागते. यासाठी, अनेक वेळा बहुतेक महिला डिटर्जंटच्या पाण्याने तेलकट व हट्टी डाग असलेली फरशी तासंतास घासावी लागते. अशातच काही किचन हॅक्स आहेत जे साचलेली घाण साफ करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

स्वयंपाक करताना बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे पडतात किंवा विशेषतः जर मसाले आणि तेल स्वयंपाक करताना सांडले तर त्याचे डाग आणि चिकटपणा साफ करणे खूप त्रासदायक ठरते. बऱ्याच वेळा आपण कोपऱ्यात सांडलेले मसाले किंवा घाण साचण्याकडे लक्ष देत नाही जे साचते आणि चिकट होण्यासोबतच कीटक आणि अदृश्य बॅक्टेरियांना देखील प्रोत्साहन देते. चला तर मग जाणून घेऊया काही टिप्स आणि युक्त्या ज्या स्वयंपाकघरातील चिकट व तेलकट फरशी साफसफाई करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

लिंबू आणि व्हिनेगर

लिंबू स्वयंपाकघरात सहज मिळते, प्रत्येकांच्या घरात लिंबू व व्हिनेगर असतेच. या दोन्ही गोष्टींचे मिश्रण तुमच्या स्वयंपाकघरात किंवा घरात कुठेही फरशी स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. यामुळे केवळ घाणच नाही तर बॅक्टेरिया देखील दूर होतात. लिंबाचा रस आणि व्हिनेगर एका स्प्रे बाटलीत भरा आणि नंतर जिथे डाग किंवा चिकटपणा असेल तिथे स्प्रे करा आणि काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्वयंपाकघरातील फरशीला असलेला चिकटपणा लवकर साफ होईल.

बेकिंग सोडा उपयुक्त

बेकिंग सोडा हा स्वयंपाकघरातील स्वच्छतेसाठी एक उत्तम घटक आहे, विशेषतः जर तुम्हाला तेलकटपणा काढून टाकायचे असेल तर बेकिंग सोडा वापरणे चांगले. सिंक आणि ड्रेन स्वच्छ करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे. यासाठी बेकिंग सोड्यात लिंबू आणि मीठ टाकून मिक्स करा. आता यात थोडे पाणी टाकून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट तेलकट फरशी किंवा स्वयंपाकघरात जिथे डाग आहे तिथे ही पेस्ट लावा आणि थोडावेळ तसेच राहू द्या, त्यानंतर साफ करा. अशाने तेलकटपणा लगेच निघून जाते. गरम पाण्यात हे तीन घटक टाकून तुम्ही ड्रेन सहजपणे स्वच्छ करू शकता.

अमोनिया एक उत्कृष्ट क्लिनर

जर तुम्हाला घरगुती वस्तूंपासून उपाय तयार करण्यात त्रास होत असेल, तर तुम्ही बाजारात सहज उपलब्ध असलेला अमोनिया खरेदी करू शकता. एक कप अमोनिया एका बादली पाण्यात मिक्स करा आणि या पाण्याने फरशी आणि स्लॅब स्वच्छ करा. काही मिनिटांत तुमचे स्वयंपाकघर चमकू लागेल. या लिक्वीडने साफसफाई करताना, खिडक्या आणि दरवाजे उघडे असल्याची खात्री करा. फेस मास्क वापरा, कारण त्याचा वास खूप तीव्र असतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)