पुढच्या वर्षी सुट्ट्यांचा धमाका, आठवड्यातून एकच दिवस सुट्टी आणि चार दिवस मज्जा!

| Updated on: Dec 27, 2020 | 10:07 PM

यंदाचे वर्ष लाकडाऊनमध्ये गेल्याने अनेकांचे फिरायला जाण्याचे प्लॅन फसले आहेत. (Four Days Holiday Plan In 2021)

पुढच्या वर्षी सुट्ट्यांचा धमाका, आठवड्यातून एकच दिवस सुट्टी आणि चार दिवस मज्जा!
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 2020 हे संपूर्ण वर्ष जगासाठी त्रासदायक ठरलं आहे. हे वर्ष कधी संपणार? याचे सर्वांना वेध लागले आहे. नव्या वर्षाला उत्साहाने आणि संकल्पनांसह सामोरे जाण्याची अनेकजण विविध योजना आखत आहे. जगभरात 2021 चे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे अनेकांनी 2021 चे कॅलेंडर चाळायला सुरुवात केली आहे. (Four Days Holiday Plan In 2021)

यंदाचे वर्ष लाकडाऊनमध्ये गेल्याने अनेकांचे फिरायला जाण्याचे प्लॅन फसले आहेत. मात्र हे फसलेले प्लॅन तुम्हीही येत्या वर्षात करु शकता. कारण 2021 मध्ये अनेक लाँग विकेन्ड आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी सहज एखादी जास्त सुट्टी टाकून फिरायला, पिकनिकला जाण्याचा प्लॅन करु शकता.

फिरायला जाण्यासाठी जोडून येणाऱ्या सुट्ट्या कोणत्या आहेत? हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. काही सार्वजनिक सुट्ट्या रविवारी आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असेल, मात्र आगामी वर्षात सर्वांना बहुतेक सुट्ट्यांचा आनंद घेता येऊ शकतो.

जानेवारी

जानेवारी महिन्यात दोन वेळा तुम्हाला लाँग विकेन्डचा अनुभव घेता येणार आहे. कारण मकर संक्रात हा सण गुरुवारी 14 जानेवारीला आहे. त्यानंतर तुम्ही 15 जानेवारीला शुक्रवारी एक सुट्टी घेतली, तर त्यानंतर शनिवारी आणि रविवार असे तब्बल चार दिवस तुम्हाला सुट्टी मिळू शकते. तसेच यंदा प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला आहे. त्यामुळे तुम्ही सोमवारी रजा घेऊन शनिवार ते मंगळवार असे चार दिवस सुट्टी घेऊ शकता.

मार्च

येत्या 11 मार्चला म्हणजेच गुरुवारी महाशिवरात्रीची सुट्टी आहे. त्यानंतर जर तुम्ही शुक्रवारी एक सुट्टी घेतली तर पुढचा शनिवार-रविवार मिळून तुम्हाला छान चार दिवस बाहेर फिरायला जाता येऊ शकते. (Four Days Holiday Plan In 2021)

मे

मार्चनंतर थेट मे महिन्यात लाँग विकेन्डची संधी मिळणार आहे. मे महिन्यात 13 तारखेला ईद आहे. त्यानंतर तुम्ही शुक्रवारी सुट्टी घेऊन 13 मे ते 16 मे पर्यंत सुट्ट्या घेऊन छान एन्जॉय करु शकता.

जुलै

मे महिन्यानंतर तुम्हाला जुलै महिन्यात सलग सुट्टी एन्जॉय करता येईल. येत्या 20 जुलैला मंगळवारी ईदची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी तुम्ही एक दिवस सुट्टी घेऊन चार दिवस आऊटींग करु शकता.

नोव्हेंबर

पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा फिरण्याची संधी मिळणार आहे. 4 नोव्हेंबरला गुरुवारी सुट्टी आहे. त्यामुळे जर तुम्ही शुक्रवारी सुट्टी घेतली तर पुढील लागोपाठ शनिवार रविवारची सुट्टी घेऊन फिरण्याचे प्लॅन करु शकता. (Four Days Holiday Plan In 2021)

संबंधित बातम्या : 

देशात आपत्कालीन वापरासाठी कोणत्या लसीला केंद्राकडून मंजुरी मिळणार?

मोदींच्या मन की बातमधली केसरची शेती कशी देते लाखो कमाईची संधी?