विमान प्रवासात छोटे कपडे का घालू नयेत ? एअर होस्टेसनेच सांगितलं खास सिक्रेट

What Should Not Wear On Plane : आजकाल लोक त्यांच्या एअरपोर्ट लूकबद्दल खूप जागरूक आहेत आणि फॅशनेबल दिसण्यासाठी काहीही घालतात. पण स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात काही कपडे प्रवासात तुमच्यासाठी अनकम्फर्टेबल ठरू शकतात. त्यामुळे विमानातील प्रवासादरम्यान असे कपडे घालणं टाळा, जे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

विमान प्रवासात छोटे कपडे का घालू नयेत ? एअर होस्टेसनेच सांगितलं खास सिक्रेट
विमानात चढताना कोणते कपडे घालू नयेत ?
Image Credit source: social media
| Updated on: Jul 03, 2025 | 3:16 PM

आजकाल लोकं जेव्हा विमान प्रवासाला जातात तेव्हा ते बऱ्याच वेळेस सेलिब्रिटींसारखे दिसण्यासाठी काहीही कपडे घालून जातात. कारण आजकाल एअरपोर्ट लूक देखील खूप प्रसिद्ध झाला आहे, काही लोक ट्राउझर्स आणि टी-शर्ट घालून बाहेर पडतात, तर काही लोक कुर्ती सूटसारख्या पारंपारिक पोशाखाने आपला प्रवास सुरू करतात. पण एका एअर होस्टेसच्या सांगण्यानुसार, असे कपडे घालू नयेत ज्यामुळे तुमचा प्रवास खराब होऊ शकतो. त्यांच्या सांगण्यानुसार, असे बरेच लोक आहेत जे फॅशनेबल कपडे घालतात आणि नंतर त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ येते. तुम्हीही असं काही करत असाल तर आत्ताच सावध व्हा आणि विमान प्रवासात कोणते कपडे घालणं टाळावं ते जाणून घ्या.

छोटे कपडे, क्रॉप कपडे

आपण नेहमीच फॅशनच्या किंवा आरामाच्या नावाखाली शॉर्ट्स किंवा क्रॉप कपडे घालून बाहेर पडतो. उदा – जसे मुली क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स घालून बाहेर पडतात आणि मुलेही शॉर्ट्स किंवा कॅप्रीज घालून बाहेर पडतात. पण लांबच्या प्रवासात याच गोष्टी त्रासदायक ठरतात कारण 38000 फूट उंचीवर उडणाऱ्या विमानात एसी एक मिनिटही थांबू शकत नाही. अशा परिस्थितीत, एकतर व्यक्तीकडे स्वतःचा ब्लँकेट किंवा शाल असावी किंवा कपडे असे असावेत जे थंडीपासून संरक्षण करू शकतील. छोट्या कपड्यांमुळे प्रवासभर कुडकुडत रहावे लागू शकते.

फ्लिप फ्लॉप्स

कपड्यांव्यतिरिक्त, जर आपण चप्पलांबद्दल बोललो तर, जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास केला असेल तेव्हा तुम्ही विमानतळावर फ्लिप फ्लॉप घातलेले लोक पाहिले असतील. आता असे फुटवेअर आरामदायी वाटतील, पण एअर होस्टेसच्या मते, अशा चपलांचा इमर्जन्सी गेटकडे जाण्यासाठी अजिबात उपयोग नाही. तुम्ही त्यात धावताना पडू शकता आणि दिसायला देखील अशा चपला विमानतळावर अजिबात चांगले दिसत नाहीत.

पॉलिस्टर आणि सिंथेटिक कपडे

असे कपडे कितीही चमकदार आणि ब्रँडेड दिसत असले तरी त्यांचे कापड अजिबात योग्य नसते. केबिन क्रूच्या मते, फ्लाइटमध्ये एसीत चढ-उतार होतो, त्यामुळे जर एसी मध्ये काम करत नसेल तर तुम्हाला अशा कपड्यांमध्ये अस्वस्थ वाटू शकते. तसेच, विमानाला टेकऑफ करण्यासाठी थोडा वेळ लागतो, कारण विमान सर्व प्रवाशांच्या आगमनाची वाट पाहत असते, आता अशा परिस्थितीत तुम्ही उकाड्यात बसू शकत नाही, म्हणून तुम्ही ब्रिथेबल म्हणजेच सुती कपडे घालणे चांगलं ठरतं.

घट्ट कपडे टाळा

खरंतर आगीपासून कोणीही वाचू शकत नाही, पण विमान प्रवासात घट्ट कपडे घालण्याचा प्रयत्न करू नका. कारण कधी जर कुठेही आगीसारखी परिस्थिती उद्भवली तर सिंथेटिक कापड लवकर आग पकडतात आणि तुम्हीही त्यात लवकर अडकू शकता, जर असे होऊ नये असे वाटत असेल तर असे कापड घाला जे तुमचे आगीपासून संरक्षण करू शकतील.

स्ट्रेचेबल किंवा ॲडजस्टेबल कपडे घालावेत

​विमानात प्रवास करताना, असे कपडे घालावेत जे स्ट्रेचेबल असतील आणि ॲडजस्टेबल सतील. कारण जेव्हा विमान टेकऑफ करतं तेव्हा अनेकांना पोट फुगण्याची समस्या, डोके जड होणे किंवा उलट्या झाल्यासारखे वाटू लागते. त्यामुळेच तुम्ही असे कपडे घालणे चांगलं ठरतं जे तुम्हाला हवे तसे ॲडजस्ट करता येतील किंवा सैल असतील. किंवा गरज पडल्यास ते उघडता येतील.