ऑफिसला जाताना क्लासी लूककरिता ‘या’ लिपस्टिक शेड्सचा करा वापर

प्रत्येक मुलीला मेकअप करायला खूप आवडते. अशातच मेकअप करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अशातच मेकअप करताना आपण जेव्हा लिपस्टिक लावतो तेव्हा तो पुर्ण होतो. तर लिपस्टिक तुमच्या चेहऱ्याचे तेज वाढवण्यासोबतच तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो. तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी क्लासी दिसण्यासाठी कोणत्या लिपस्टिक शेड्स वापरणे परफेक्ट ठरेल ते आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

ऑफिसला जाताना क्लासी लूककरिता या लिपस्टिक शेड्सचा करा वापर
| Edited By: | Updated on: Jun 20, 2025 | 2:31 PM

आजच्या या फॅशनच्या युगात प्रत्येकाला आपला लुक आकर्षक क्लासी आणि परफेक्ट दाखवायचा असतो. यासाठी बहुतेकजण अनेक महागडे ब्रँडेड कपड्यांपासून ते मेकअपपर्यंत सगळ्या गोष्टींवर खर्च करत असतात. तर प्रत्येक महिला या ऑफिसला जाताना व पार्टी तसेच इतर कार्यक्रमांना जाण्यासाठी मेकअप करतातच. प्रत्येकीला मेकअप करायला आवडतोच. यामध्ये लिपस्टिक हा मेकअपचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण लिपस्टिक फक्त रंग नाही तर तो लूक बदलण्यास आण‍ि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो. म्हणून प्रत्येक कार्यक्रमानुसार कोणताही लिपस्टिक शेड निवडणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला एक परफेक्ट लूक हवा असेल, तर या लिपस्टिक शेड्स खूप तुम्हाला मदत करतील. तर या लेखात आपण अशा लिपस्टिक शेड्सबद्दल जाणून घेऊ जे एकदम क्लासी लूक देतील.

ओठांवर लावलेली लिपस्टिक तुमचा लूक बदलण्या व्यतिरिक्त ओठांचे संरक्षण देखील करते, परंतु यासाठी तुम्ही चांगल्या दर्जाची लिपस्टिक खरेदी करावी. बाजारात अनेक लिप ग्लॉस किंवा लिपस्टिक स्टिक उपलब्ध आहेत जे जीवनसत्त्वे आणि मॉइश्चरायझिंग घटकांनी समृद्ध आहेत, जे तुमचे ओठ हायड्रेट ठेवतात आणि ओठांच्या त्वचेवरील कोरडेपणा टाळतात. ऑफिससाठी तुम्ही कोणते लिप शेड निवडावेत ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊया.

चॉकलेटी किंवा ब्राऊन रंग

ऑफिससाठी तुम्ही चॉकलेटी किंवा ब्राऊन रंगांची लिपस्टिक निवडू शकता. हे दोन्ही रंग अतिशय क्लासी आणि बोल्ड लूक देतात. चॉकलेटी किंवा ब्राऊन रंग प्रत्येक त्वचेच्या टोनसाठी योग्य आहेत. विशेषतः गडद त्वचेवर चांगले दिसतात.

प्लम किंवा पर्पल रंगाची लिपस्टिक

ऑफिसला जाताना तुम्हाला परफेक्ट लूक हवा असेल तर यासाठी तुम्ही पर्पल किंवा प्लम रंगाची लिपस्टिक निवडू शकता. हे दोन्ही लिप शेड्स तुम्हाला एक रिच अशी लूक देतील आणि गोऱ्या ते गडद त्वचेच्या टोनसाठी सर्वोत्तम शेड्स आहेत. मॅट फिनिशसह हे दोन्ही रंग निवडण्याचा प्रयत्न करा.

कोरल लिप शेड्स

ऑफिससाठी तुम्ही कोरल लिप शेड्स रंगाची लिपस्टिक देखील निवडू शकता. हा एक लोकप्रिय आणि क्लासिक समर लिप शेड आहे. त्वचेचा रंग गडद असो किंवा गोरा, हे शेड्स सर्वांनाच चांगले दिसतात. तथापि जर तुमची त्वचा गडद रंगाची असेल तर तुम्ही ब्राईट ग्लोसी कोरल लावणे टाळा.

पीची न्यूड आणि गुलाबी लिप शेड्स

तुमच्या ऑफिस लिपस्टिक सेटमध्ये तुम्ही पीची न्यूड आणि फिकट गुलाबी लिप शेड्स ॲड करू शकता. पीची न्यूड आणि गुलाबी लिप शेड्स रंगाच्या लिपस्टिक गोऱ्या त्वचेच्या टोनवर चांगले दिसतात. तसेच जर तुम्हाला कॉन्फिडेंस असेल तर तुम्ही कामाच्या ठिकाणी हे लिप शेड्स निवडू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)