AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतापुढे सर्वात मोठं संकट, पाकिस्तान रचतोय भयंकर कट, बांगलादेशला सोबत घेऊन…

पाकिस्तान लवकरच काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पाकिस्तान बांगलादेशलाही सोबत घेत आहे. लवकरच या दोन्ही देशांत एक मोठा करार होणार आहे. हा करार प्रत्यक्षात झाला तर भारताला फटका बसू शकतो.

भारतापुढे सर्वात मोठं संकट, पाकिस्तान रचतोय भयंकर कट, बांगलादेशला सोबत घेऊन...
shehbaz sharifImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 22, 2025 | 5:27 PM
Share

Pakistan Bangladesh Agreement : सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक देश आपल्या व्यापाराचा विस्तार कसा होईल? जगभरातून देशात कशी गुंतवणूक येईल? यासाठी प्रयत्न करत आहे. सोबतच आपल्या देशाची सुरक्षा अबाधित राहावी यासाठीदेखील अनेक देश लष्कराला बळ पुरवत आहेत. आपल्या सोईच्या देशांसोबत अनेक देश संरक्षणविषयक करार घडवून आणत आहेत. असे असतानाच आता भारताची चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. पाकिस्तान एक मोठा सैन्यविषयक करार घडवून आणत असून याचा भारताला भविष्यात फटका बसू शकतो.

पाकिस्तान नेमकं काय करू पाहतोय?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एक महत्त्वाचा संरक्षणविषयक करार होणार आहे. त्या दिशेने दोन्ही देश पावलं टाकत आहेत. या संरक्षण कराराअंतर्गत दोन्ही देश एकमेकांना लष्करी पातळीवर सहकार्य करण्यास वेगळी दिशा मिळणार आहे. सध्यातरी दोन्ही देश या करारावर चर्चा करत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि लष्करी अधिकारी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर आता या दोन्ही देशांत संरक्षण करार होत असल्याचे समोर आले आहे.

या कराराविषयीचे वृत्त CNN-News18 या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र्र मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. या करारासाठी ड्राफ्ट तयार केला जात असून लवकरच त्याला अंतिम स्वरुप मिळणार आहे.

भारताला नेमका काय फटका बसणार?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या जरी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात संरक्षणविषय करार होत असला तरी सध्यातरी या कराराला प्रत्यक्ष रुप मिळण्याची शक्यता कमी आहे. लवकराच बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ही निवडणूक झाल्यानंतर तिथे नव्या सरकारची स्थापना होईल. त्यानंतरच पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील कराराला अंतिम स्वरुप मिळू शकते. हा करार अस्तित्त्वात आला तर पाकिस्तानचे बळ वाढू शकते. तसेच पाकिस्तानचे बळ वाढले तर त्याचा फटका भारताला बसू शकतो. त्यामुळे भविष्यात नेमके काय काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.