AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय पक्ष मालामाल, भाजपा की काँग्रेस; कोणत्या पक्षाला मिळाली सर्वात जास्त देणगी?

Donation to BJP : देशभरातील राजकीय पक्षांनी इलेक्शन बाँडच्या माध्यमातून निधी मिळत होता, मात्र फेब्रुवारी 2024 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक बाँड योजना रद्द केली होती. आता कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला आहे ते जाणून घेऊयात.

राजकीय पक्ष मालामाल, भाजपा की काँग्रेस; कोणत्या पक्षाला मिळाली सर्वात जास्त देणगी?
Donation for Politicle partiesImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 22, 2025 | 5:24 PM
Share

देशभरातील राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. याआधी इलेक्शन बाँडच्या माध्यमातून निधी मिळत होता, मात्र फेब्रुवारी 2024 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक बाँड योजना रद्द केली होती. त्यामुळे राजकीय पक्षांच्या निधीत घट होण्याची शक्यता होती, मात्र या निर्णयाचा फारसा प्रभाव पडलेला नाही. बाँड योजना रद्द केल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षात भाजपला मोठ्या प्रमाणात देणगी मिळाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपाला 6088 कोटी रुपयांची देणगी

समोर आलेल्या माहितीनुसार, 2024-25 या काळात पक्षाला भाजपाला 6088 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 53 टक्क्यांनी जास्त आहे. भाजपला 2023-24 मध्ये 3967 कोटींचा निधी मिळाला होता. भाजपने निधी मिळाल्याचा अहवाल 8 डिसेंबर रोजी सादर केला आणि गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने तो प्रकाशित केला. 2024-25 या आर्थिक वर्षात काँग्रेसला 522 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. हा आकडा भाजपपेक्षा 12 पटींनी कमी आहे.

भाजपने मिळालेल्या देणग्यांबाबत 162 पानांचा अहवाल सादर केला होता. यातील माहितीनुसार 2024-2025 मध्ये, निवडणूक विश्वस्तांनी भाजपला 3744 कोटी रूपये देणगी दिली. हा आकडा एकूण देणगीच्या 61 टक्के आहे. तसेच उर्वरित 2344 कोटींची रक्कम इतर व्यक्तींनी दान केलेली आहे. ट्रस्ट व्यतिरिक्त भाजपला काही कंपन्यांनीही देणगी दिलेली आहे. हा रक्कमही खूप मोठी आहे.

देणगी देणाऱ्या कंपन्या

  • सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड – 100 कोटी रुपये
  • रुंगता सन्स प्रायव्हेट लिमिटेड – 95 कोटी रुपये
  • वेदांत लिमिटेड – 67 कोटी रुपये
  • मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड – 65 कोटी रुपये
  • डेरिव्ह इन्व्हेस्टमेंट्स – 53 कोटी रुपये
  • मॉडर्न रोड मेकर्स प्रायव्हेट लिमिटेड – 52 कोटी रुपये
  • लोटस होमटेक्स्टाइल लिमिटेड – 51 कोटी रुपये
  • सफल गोयल रिअॅलिटी एलएलपी – 45 कोटी रुपये
  • आयटीसी लिमिटेड – 39 कोटी रुपये
  • ग्लोबल आयव्ही व्हेंचर्स एलएलपी – 35 कोटी रुपये
  • आयटीसी इन्फोटेक इंडिया लिमिटेड – 33.5 कोटी रुपये
  • हिरो एंटरप्रायझेस पार्टनर व्हेंचर्स – 30 – कोटी रुपये
  • मॅनकाइंड फार्मा लिमिटेड – 30 कोटी रुपये
  • सुरेश अमृतलाल कोटक – 30 कोटी रुपये
  • हिंदुस्तान झिंक लिमिटेड – 27 कोटी रुपये

2024 -25 या आर्थिक वर्षात भाजपला 2019-20 नंतर सर्वाधिक देणगी मिळाली आहे. कॉर्पोरेट घराण्यांनी चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा बँक ट्रान्सफरद्वारे राजकीय पक्षांना देणगी देऊ शकतात. पक्षांनी त्यांच्या अहवालात आणि वार्षिक ऑडिट अहवालात देणग्या देणाऱ्यांची नावे आणि रक्कम उघड करणे गरजेचे आहे. ही माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागते.

शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.