थंडीत तुमचे ओठ राहतील मऊ आणि गुलाबी, यासाठी घरी बनवा ‘हे’ नैसर्गिक लिप बाम

हिवाळा सुरू झाला की त्वचेच्या समस्या निर्माण होतात. अशातच जास्त समस्या सतावते ती म्हणजे ओठांची. हिवाळ्यात तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी राहावे यासाठी घरगुती लिप बाम लावा. चला तर आजच्या लेखात आपण घरगुती पद्धतीने लिप बाम बनवावा हे जाणून घेऊयात.

थंडीत तुमचे ओठ राहतील मऊ आणि गुलाबी, यासाठी घरी बनवा हे नैसर्गिक लिप बाम
lip bam
| Edited By: | Updated on: Nov 24, 2025 | 5:13 PM

हिवाळा सुरू झाला की आरोग्यापासून त्वचेच्या समस्या सतावू लागतात. तर अनेकांना हिवाळ्यात ओठ फाटणे आणि कोरडे होणे ही एक सामान्य समस्या सतावत असते. त्यात ही समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही त्रास देते. अनेक महिला फाटलेले ओठांवर उपाय करण्यासाठी बाजारातून मॉइश्चरायझिंग लिप बाम, लिपस्टिक किंवा टिंट्स खरेदी करतात. आजकाल लिप बाम देखील वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत; ते ओठांना नैसर्गिक रंग देतात. मात्र बाजारातुल खरेदी केलेल्या लिपबाम मध्ये केमिकल घटक असल्याने तुमच्या ओठांना तात्पुरते ओलावा देऊ शकतात, परंतु काही दिवसांनी मात्र हेच लिपबाम ओठांना नुकसान पोहोचवू शकतात. तर यासर्वांवर सर्वोत्तम उपाय म्हणजे घरगुती नैसर्गिक लिपबाम. आपल्यापैकी बरेच लोकं नैसर्गिक घटकांना प्राधान्य देत त्यापासून घरी लिप बाम बनवतात, कारण हे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय उत्कृष्ट परिणाम देतात.

जर तुम्हाला या हिवाळ्यात तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी ठेवायचे असतील, तर तुम्ही फक्त दोन नैसर्गिक घटकांचा वापर करून घरी नैसर्गिक लिपबाम बनवू शकता. या लेखात आपण घरगुती पद्धतीने लिपबाम कसा बनवायचा आणि तो कसा वापरायचा हे जाणून घेणार आहोत.

या 2 गोष्टींनी बनवा घरगुती लिपबाम

हिवाळ्यात बाजारात मिळणारे बीट हे एक लोकप्रिय फळ आहे. त्याचा नैसर्गिक लाल रंग तुमच्या ओठांना गुलाबी करण्यासाठी परिपूर्ण आहे. तुम्ही बीट आणि तूप वापरून घरगुती लिपबाम तयार करू शकता. तूप तुमच्या ओठांना मॉइश्चरायझ करेल आणि त्यांना मऊ करेल.

बीट आणि तुपापासून घरगुती लिपबाम कसे बनवायचे ते जाणून घेऊयात

नैसर्गिक लिपबाम तयार करण्यासाठी एक बीट घ्या आणि ते किसून घ्या. ते एका सुती कापडात ठेवा आणि त्याचा रस पिळून घ्या. एक वाटी घ्या आणि बीटच्या रसात एक चमचा तूप मिक्स करा. दोन्ही घटक घट्ट पेस्ट तयार होईपर्यंत नीट मिसळा. पेस्ट एका लहान काचेच्या डब्यात ठेवा. तुम्ही ही घरगुती लिपबाम एक ते दोन महिने वापरू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरुषही हे लिपबाम लावू शकतात.

नैसर्गिक पद्धतीने बीट आणि तुपापासून तयार केलेला लिपबाम अशा प्रकारे लावा

बीट आणि तूपापासून बनवलेला हा लिपबाम वापरण्याची पद्धत नेहमीच्या लिपबामपेक्षा थोडी वेगळी आहे. तुमच्या बोटांनी हा लिपबाम ओठांवर हळूवारपणे लावा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पुसून काढा. हा एक उत्तम लिपबाम म्हणून काम करतो. तुम्ही तो रात्रभरही तसेच ठेवू शकता. सकाळी उठल्यावर तुम्हाला मऊ, गुलाबी ओठ मिळतील जे दिवसभर तसेच राहील. हिवाळ्यात दररोज याचा वापर केल्याने नक्कीच फरक पडेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)