AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिसेंबरच्या या 3 तारखा बॉलिवूडसाठी लकी ठरल्या; या दिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट सुपरहिट ठरले

डिसेंबर महिन्याच्या 1, 4 आणि 5 या तीन तारखा बॉलिवूडसाठी नेहमीच लकी ठरल्या आहेत. या दिवशी प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले असून त्यांनी विक्रमी कमाई केली आहे. सध्या 'धुरंधर' ची रिलीजची तारीख याच तारखांपैकी असून हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याव्यतिरिक्त आणखी कोणते चित्रपट आहेत जाणून घेऊयात.

डिसेंबरच्या या 3 तारखा बॉलिवूडसाठी लकी ठरल्या; या दिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट सुपरहिट ठरले
These 3 dates in December always prove lucky for Bollywood;Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 17, 2025 | 11:05 AM
Share

“धुरंधर” हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 10 दिवसांतच त्याने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. गेल्या काही वर्षांत डिसेंबरमध्ये असंख्य चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि त्यांनी देखील कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. डिसेंबरमधील काही तारखा बॉलिवूडसाठी नेहमीच लकी ठरल्या आहेत. या तारखांनी कलाकारांना चित्रपटाच्या कथा आणि उत्कृष्ट अभिनय करण्याची संधी दिली. या तारखांना प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांनी 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सध्या रिलीज झालेला “धुरंधर” देखील रेकॉर्डब्रेक कमाई करताना दिसत आहे.

डिसेंबरच्या तीन तारखा

लकी तारखांबद्दल बोलायचं झालं तर ते म्हणजे 1 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर. या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर लक्षणीय कमाई केली आहे आणि आजही ते चित्रपट चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहेत.

रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट

1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीरने त्याच्या अ‍ॅक्शन आणि त्याच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर 917 कोटींची कमाई केली. त्याच दिवशी विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकी कौशलने उत्कृष्ट अभिनय केला. 50 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 128 कोटींची कमाई केली.

4 डिसेंबर रोजी

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने सर्वांना प्रभावित केले. 4 डिसेंबर 2024 रोजी ‘पुष्पा 2’ प्रदर्शित झाला. चित्रपटाने सर्वत्र खळबळ उडवून दिली. या चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की तो आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1800 कोटी रुपयांची कमाई केली.

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला . ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दहा दिवसांतच चित्रपटाने 350 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जर चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहिली तर चित्रपटाला 500 कोटींचा टप्पा ओलांडण्यास फार काळ लागणार नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती रेकॉर्ड मोडतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.