AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makeup Tips: फाउंडेशनसोबत नेमकं काय लावायचं? वाचा ग्लोइंग लुकचं सीक्रेट!

मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर हवा तसा ग्लो दिसत नाहीये? फाउंडेशनसोबत काही खास मेकअप प्रोडक्ट्सचा वापर केल्यास चेहऱ्याला ग्लॉसी आणि शाइनी फिनिश मिळू शकते. सण उत्सवाच्या काळात या काही खास मेकअप टिप्सने तुम्ही तुमचा लुक आणखी आकर्षक बनवू शकता.

Makeup Tips: फाउंडेशनसोबत नेमकं काय लावायचं? वाचा ग्लोइंग लुकचं सीक्रेट!
make upImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Sep 25, 2026 | 12:32 PM
Share

नवरात्रीच्या गरब्यापासून दिवाळीच्या पार्टीपर्यंत, या सणासुदीत प्रत्येकाला आपला मेकअप परफेक्ट आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असतो. मात्र महागडे मेकअप प्रोडक्ट्स वापरूनही मेकअपनंतर चेहरा निस्तेज किंवा कोरडा दिसत असेल, तर फाउंडेशन बदलण्याआधी मेकअपची बेस तयारी योग्य आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. त्वचेला योग्य प्रकारे मॉइश्चराइज करणे, प्राइमरचा वापर करणे आणि फाउंडेशनसोबत काही खास प्रोडक्ट्स वापरणे यामुळे मेकअपला अधिक फ्रेश आणि ग्लोइंग फिनिश मिळू शकते. मग फाउंडेशनसोबत नेमकं काय वापरायचं आणि चेहऱ्यावर हवा तसा ग्लो कसा मिळवायचा? जाणून घ्या या सोप्या मेकअप ट्रिक्स, ज्या यंदाच्या नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत तुमचा लुक अधिक खास बनवू शकतात.

आधी त्वचेला करा मॉइश्चराइज

फाउंडेशन लावण्यापूर्वी चेहरा फेस वॉशने स्वच्छ करून त्वचेला चांगले मॉइश्चराइज करणे महत्त्वाचे आहे. त्वचा कोरडी असल्यास फाउंडेशन पॅची दिसू शकते आणि मेकअपचा बेसही व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर वापरा. मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो आणि त्यामुळे फाउंडेशन अधिक सहजपणे ब्लेंड करता येते.

प्राइमर वापरायला विसरू नका

मेकअपच्या आधी प्राइमर लावल्याने त्वचेवर एकसारखा बेस तयार होण्यास मदत होते. यामुळे फाउंडेशन थेट त्वचेवर जड दिसण्याऐवजी अधिक स्मूद पद्धतीने बसू शकते. ग्लोइंग लुक हवा असल्यास ड्यूई किंवा इल्यूमिनेटिंग प्रकारचा प्राइमर वापरता येतो. मात्र प्राइमर निवडताना आपल्या त्वचेचा प्रकार लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

फाउंडेशनसोबत स्ट्रोब क्रीम

चेहऱ्यावर ग्लॉसी आणि शाइनी फिनिश हवी असेल, तर फाउंडेशनसोबत स्ट्रोब क्रीमचा वापर करता येतो. यासाठी हाताच्या मागील बाजूस थोडे फाउंडेशन घेऊन त्यात अगदी कमी प्रमाणात स्ट्रोब क्रीम मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून स्पंज किंवा ब्रशच्या मदतीने व्यवस्थित ब्लेंड करा. स्ट्रोब क्रीम जास्त प्रमाणात वापरण्याऐवजी सुरुवातीला कमी प्रमाणात वापरल्यास अधिक नैसर्गिक ग्लो मिळू शकतो.

मेकअप फिक्सरचा योग्य वापर

मेकअप फिक्सरचा वापर केवळ मेकअपच्या शेवटीच करायचा असतो असे नाही. मेकअपच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सेटिंग स्प्रेचा हलका वापर केल्याने बेस अधिक फ्रेश दिसण्यास मदत होऊ शकते. मात्र चेहऱ्यावर स्प्रे करताना तो खूप जवळून किंवा जास्त प्रमाणात वापरू नये. उत्पादनाच्या सूचनांनुसार त्याचा वापर करणे योग्य ठरते.

लिक्विड हायलायटर ठरेल उपयोगी

चेहऱ्यावर नॅचरल चमक आणण्यासाठी लिक्विड हायलायटरचाही वापर करता येतो. चीक बोन्स, नोझ ब्रिज आणि कपाळाच्या काही भागांवर अगदी थोड्या प्रमाणात हायलायटर लावता येतो. तो व्यवस्थित ब्लेंड केल्यास चेहऱ्यावर प्रकाश पडल्यावर हलकी चमक दिसते. मात्र हायलायटरचे प्रमाण जास्त झाल्यास मेकअप अतिशय चमकदार दिसू शकतो, त्यामुळे कमी प्रमाणात वापरणे योग्य.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास