AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाळिशीतही चेहरा दिसेल चमकदार, फक्त स्वयंपाकघरात असलेल्या ‘या’ 5 गोष्टींनी तयार करा फेस टोनर

बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. अशातच प्रत्येकाला चकमदार त्वचा हवी असते यासाठी अनेक उपाय केले जातात. तर आजच्या या लेखात आपण चमकदार त्वचेसाठी घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून नैसर्गिक फेस टोनर कसा बनवू शकता ते जाणून घेऊयात...

चाळिशीतही चेहरा दिसेल चमकदार, फक्त स्वयंपाकघरात असलेल्या 'या' 5 गोष्टींनी तयार करा फेस टोनर
homemade face toner Image Credit source: tv9 marathi
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Jun 30, 2025 | 7:10 PM
Share

वातावरणातील बदल आणि दमट हवामान यामुळे यासर्वांचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ आणि मुरूम यांसारख्या समस्या निर्माण होत असतात. अशातच त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी लोकं अनेकदा फेस टोनर वापरतात. अशावेळेस बहुतेकजण हे बाजारात उपलब्ध असलेले महागडे टोनर खरेदी करतात तसेच केमिकल बेस्ड असतात, ज्यामुळे कधीकधी ते त्वचेच्या समस्या निर्माण करतात. यासाठी तुम्ही नैसर्गिकरित्या टोनरचा वापर करून त्वचा चमकदार बनवा. चला तर मग जाणून घेऊया घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही नैसर्गिक फेस टोनर कसा बनवू शकता.

फेस टोनर हे एक प्रकारचे द्रव आधारित त्वचेची काळजी घेणारे उत्पादन आहे. जे चेहरा स्वच्छ केल्यानंतर लावले जाते. ते त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. तसेच त्वचेच्या छिद्रांना घट्ट करण्यास मदत करते. म्हणून तुम्ही घरी सोप्या पद्धतीने फेस टोनर बनवू शकता.

1. तुम्ही अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरून फेस टोनर देखील बनवू शकता. ते बनवण्यासाठी, एक कप अ‍ॅपल सायडर व्हिनेगर तीन कप पाण्यात मिक्स करा. नंतर तयार टोनर स्प्रे बाटलीत भरून ठेवा. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे मुरुम कमी करण्यास मदत करतात. या फेस टोनरचा वापर केल्याने तुमची त्वचा मऊ आणि गुळगुळीत होईल.

2. तुम्ही गुलाब पाण्याने सुद्धा फेस टोनर तयार करू शकता. ते त्वचेच्या पीएच पातळीला संतुलित करण्यास मदत करते. कारण गुलाब पाण्याचे पीएच 4-5 च्या दरम्यान असते जे त्वचेच्या पीएच पातळीइतके असते. गुलाबपाणीचा फेस टोनर त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिक्स करून तुम्ही फेस टोनर तयार करू शकता. तर हा टोनर तुम्ही सकाळी आणि रात्री चेहऱ्यावर लावू शकता.

3. तुम्ही कोरफड आणि व्हिटॅमिन ई वापरून फेस टोनर बनवू शकता. कोरफड त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन ई वृद्धत्वविरोधी चिन्हे कमी करण्यास मदत करते. तर हा फेस टोनर बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊल मध्ये कोरफड जेल घ्या आणि नंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि गुलाबपाणी मिक्स करा. तयार टोनर बाटलीत भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा.

4. तुम्ही ग्रीन टी पासून टोनर तयार करू शकता. तर यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात पुरळ आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात आणि त्वचा चमकदार बनवतात. हा टोनर बनवण्यासाठी पाणी उकळवा आणि नंतर त्यात ग्रीन टी मिक्स करा. थंड झाल्यावर हे पाणी बाटलीत भरून ठेवा. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी ग्रीन टी पासून तयार टोनर सर्वोत्तम आहे.

5. काकडीत थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात जे उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. काकडीचे लहान तुकडे करा आणि नंतर मिक्सच्या भांडयात टाकुन बारिक करा. यानंतर त्यातील रस काढून स्प्रे बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही काकडीपासून तयार केलेला हा फेसटोनर चेहऱ्यावर दोनदा लावू शकता. काकडीत 95 टक्के पाणी असते जे त्वचेला थंड करते आणि सनबर्नवर उपचार करण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास