प्रत्येक मुलीने लग्नाला होकार देण्याआधी मुलाला हे 3 प्रश्न विचारलेच पाहिजेत, शेवटचा तर खूप महत्त्वाचा

प्रत्येक मुलीने लग्न करण्यासाठी आपल्या जोडीदाराला पैशांबाबत या 3 गोष्टी नक्की विचारल्या पाहिजेत. ज्यामुळे भविष्यात आर्थिक वाद टाळण्यास मदत होते.

प्रत्येक मुलीने लग्नाला होकार देण्याआधी मुलाला हे 3 प्रश्न विचारलेच पाहिजेत, शेवटचा तर खूप महत्त्वाचा
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 28, 2026 | 2:10 PM

लग्न ठरवताना जोडीदाराची नोकरी, पगार, कुटुंब आणि भविष्यातील स्वप्नांबाबत चर्चा केली जाते. मात्र, जोडीदाराची पैशांबाबतची विचारसरणी, खर्च करण्याच्या सवयी आणि आर्थिक नियोजन समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आर्थिक तज्ज्ञ प्रीती राठी गुप्ता यांनी लग्नाआधी पैशांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे लग्नानंतर होणारे आर्थिक गैरसमज आणि वाद टाळण्यास मदत होऊ शकते.

1. भविष्यातील आर्थिक नियोजन समजून घ्या

Loading...

लग्नानंतर घर खरेदी करणे, मुलांचे नियोजन, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे किंवा इतर मोठे निर्णय घेण्यासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे जोडीदाराची भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे काय आहेत, हे लग्नाआधी जाणून घ्या. त्याच्यावर कोणते कर्ज आहे का, कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आहे का आणि भविष्यात कोणत्या मोठ्या खर्चाचे नियोजन आहे याबाबत स्पष्ट चर्चा करा.

2. खर्च आणि बचतीच्या सवयी जाणून घ्या

काही लोकांना पैसे खर्च करून वर्तमानात आनंदाने जगायला आवडते तर काही जण भविष्यासाठी जास्तीत जास्त बचत करण्याला प्राधान्य देतात. दोन्ही विचारसरणी योग्य असू शकतात. मात्र, त्यांच्यात समन्वय नसल्यास लग्नानंतर घरखर्चावरून वाद होऊ शकतात. त्यामुळे जोडीदार पैसे कसे खर्च करतो, किती बचत करतो आणि गुंतवणुकीबाबत त्याचे काय विचार आहेत, हे समजून घ्या.

3. आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचा अधिकार

लग्नानंतर महिलेला स्वतःच्या कमाईचा वापर, बचत आणि गुंतवणूक याबाबत स्वतंत्र निर्णय घेता येणार का, यावरही चर्चा होणे आवश्यक आहे. घरखर्चाची जबाबदारी दोघे कशी सांभाळणार, संयुक्त बचत कशी करणार आणि मोठे आर्थिक निर्णय कसे घेणार, हे आधीच ठरवणे फायदेशीर ठरते. लग्नामुळे महिलेची स्वतःची ओळख आणि आर्थिक स्वातंत्र्य संपुष्टात येऊ नये याची दोघांनीही काळजी घ्यावी.

कर्ज आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांबाबतही पारदर्शकता ठेवा

पगार किती आहे, एवढेच जाणून घेणे पुरेसे नाही. जोडीदारावर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा ईएमआयची जबाबदारी आहे का, तसेच कुटुंबाला दरमहा किती आर्थिक मदत करावी लागते, याबाबतही प्रामाणिकपणे चर्चा करणे गरजेचे आहे. यामुळे लग्नानंतर अचानक आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us