Mukesh Ambani : “त्या क्षणी संतापात ते ‘गेटआऊट’ म्हणू शकले असते, पण…” मुकेश अंबानींचा शेफने सांगितलेला भन्नाट किस्सा
Mukesh Ambani : जगातील लोकप्रिय आणि गडगंज श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या शेफने सांगितलेला एक किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत, अंबानी यांच्या शेफने बोर्डरुममध्ये घडलेला एक किस्सा सांगितला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुकेश अंबानी यांची चर्चा रंगली आहे.

Mukesh Ambani : जगातील लोकप्रिय उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील मुकेश अंबानी यांचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, शेफ वरुण इनामगार यांनी मुकेश अंबानी यांचा एक अविश्वसनीय किस्सा सांगत ‘मोठी माणसं का मोठी असतात?’ याचं कारण देखील सांगितलं. मुकेश अंबानी यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी वरुण इनामगार यांना बोलावण्यात आलं होतं. तेव्हा सगळे प्रोटोकॉल तोडून वरुणा यांनी मुकेश अंबानी यांनी गुजरातीमध्ये थेट प्रश्न विचारला! तेव्हा मुकेशभाईंनी राग न करता उलट, जे काही केलं ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे..
मुकेश अंबानी यांचा एक किस्सा सांगत शेफ वरुण इनामदार म्हणले, ‘मुकेश अंबानी यांच्या सेक्रेटरीचा नेहमी फोन यायचा… मुकेशभाई यांच्या लंटसाठी (दुपारच्या जेवणासाठी) तुम्ही काही तरी करा. मला त्यांनी जवळपास सव्वाबाराला बोलावलं होतं. सेक्रेटरी म्हणाले, ‘सव्वाबारे तमे आवी जाजो. साडाबारनी ब्रेक.. ‘ मी ओके म्हटलं.. ‘
‘एक वाजला, दीड, पावणेदोन, दोन, सव्वादोन, अडीच, पावणेतीन ते काही हलतच नव्हते, तेव्हा मी काय करायचो असं फटीतून पाहायचो आणि परत दरवाजा लावायचो. कारण तेवढा वेळ सतत गरम करावं लागत होतं ना.. त्यांच्या मिटिंगरुमध्ये सतत बघायचो आणि बंद करायचो’
पुढे इनामदार म्हणाले, ‘मुकेशभाईंनी एकदा असं पाहिल तर, दरवाजा बंद तरी कसा करणार! मी बंद केला असता तर ते अपमानास्पद वाटलं असते. तर मी तो दरवाजा अजून उघडला आणि म्हटलं “मुकेशभाई केटला पैसा कमावशो चालो ने हवे जमवा लो ने…” (अजून किती पैसे कमावणार चला जेवून घ्या ना..) तर ते हसले.’
मुकेश अंबानी यांची प्रतिक्रिया सांगत इनामदार म्हणाले, ‘मुकेश धीरुबाई अंबानी यांच्याबरोबर तुम्ही नाही फालतुगिरी करु शकत. बोर्डरुममधील प्रत्येक जण चकित झाले. आता मी सांगतो मोठी माणसं मोठी का असतात? कारण, त्या क्षणी तो माणूस गेटआऊट सुद्धा म्हणू शकला असता आणि तुम्ही काय करु शकता मुकेश अंबानी यांची? माती तर तुम्ही खाल्लीये ना…’मी असं म्हटल्यानंतर ते हसले… सॉरी… सॉरी म्हणत त्यांनी सांगितलं की, ठिक आहे आपण एक ब्रेक घेऊया… ‘, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांचे देखील असे अनेक किस्से व्हायरल होत असतात.