
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकतंच तिनं पुन्हा एकदा एक सुंदर फोटोशूट केलं आहे, ज्याचे आता फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या नोरा फतेही तिच्या आगामी 'भुज - द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर यांच्यासोबत या चित्रपटात इतरही अनेक कलाकार आहेत.

नुकतंच नोरा फतेही तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती. या दरम्यान, नोरा पारंपारिक गोल्डन अनारकली ड्रेसमध्ये दिसली.

नोरानं अनारकली ड्रेससह एक निखळ रेशीम चिकनवर्क असलेला दुपट्टा देखील कॅरी केला होता.

नोरा या जॉर्जेट अनारकली ड्रेसमध्ये प्रचंड सुंदर दिसत होती. तिचे हे फोटो आता चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

डिझायनरच्या वेबसाइटवर या अनारकली सेटची किंमत 3, 69, 900 रुपये आहे.