तुम्हालाही आंघोळीनंतर लगेच घाम येतो का? कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या

अनेकदा आंघोळ करून बाहेर आल्यानंतर फ्रेश वाटण्याऐवजी प्रचंड घाम येऊ लागतो. त्याचे कारण समजून घेणे आपल्याला फारसे महत्त्वाचे वाटत नाही. पण हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते का हे जाणून घेणंही तितकेच महत्त्वाचे आहे. जाणून घेऊयात या मागचं कारण काय आहे ते.

तुम्हालाही आंघोळीनंतर लगेच घाम येतो का? कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या
Sweating after Shower-
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jun 28, 2025 | 2:29 PM

अनेकदा आंघोळ करून बाहेर आल्यानंतर फ्रेश वाटण्याऐवजी प्रचंड घाम येऊ लागतो. ही परिस्थिती अनेकांसोबत घडते. पण तुम्हाला त्यामागील कारण माहित आहे का? जर तुम्हालाही दररोज या समस्येचा सामना करावा लागत असेल तर हे कशामुळे होतं? यामागे कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकत का? आणि त्यातून सुटका कशी मिळवावी हे जाणून घेऊयात.

आंघोळीनंतर घाम का येतो?
आंघोळीनंतर घाम येणे ही एक सामान्य स्थिती असू शकते, ज्याची अनेक कारणे असू शकतात. सहसा, शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा हा शरीराचा स्वतःचा मार्ग असतो.

गरम पाण्याने आंघोळ करणे
आंघोळीनंतर घाम येणे हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा एक मार्ग असू शकतो. खरं तर, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान वाढते. हे तापमान सामान्य करण्यासाठी, शरीर घामवाटे ते बाहेर काढते जेणेकरून जास्तीची उष्णता बाहेर पडू शकेल.

बाथरूममध्ये आर्द्रता जास्त असणे
जर आंघोळ करताना बाथरूममध्ये चांगले वायुवीजन नसेल तर वाढत्या आर्द्रतेमुळे आणि उष्णतेमुळे घाम येऊ शकतो.

हार्मोन्स बदल
काही लोकांना त्यांच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे (जसे की थायरॉईड किंवा ताण) आंघोळीनंतर जास्त घाम येऊ शकतो.

संवेदनशील त्वचा
काही लोकांची त्वचा खूपच संवेदनशील असते, अशा लोकांना आंघोळीनंतर त्वचेचे छिद्र उघडल्यामुळे जास्त घाम येऊ शकतो.

पण याचा परिणाम निश्चितच आपल्या शरीरावर पडतो. त्यामुळे अनेकदा श्वास फुलणे, दम लागणे किंवा धाप लाण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी उपाययोजन करणे गरजेचे आहे.

जास्त घाम येणे कसे टाळावे

आंघोळीसाठी नेहमी थंड किंवा कोमट पाणी वापरा जास्त कडक पाणी वापरू नका.

आंघोळ करताना चांगल्या वायुवीजनासाठी एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा.

आंघोळ केल्यानंतर, शरीराला टॉवेलने न घासता हलक्या हाताने पूर्णपणे पुसून काढा.

आंघोळ केल्यानंतर लगेच जड किंवा घट्ट कपडे घालू नका.

जर तुम्हाला सामान्यपेक्षा जास्त घाम येत असेल तर डॉक्टरांकडून तपासून घ्या