रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय द्याल? Gen Z भाऊ-बहिणींसाठी खास आयडियाज

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण आहे. या खास दिवशी बाजारातून महागड्या भेटवस्तू आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवलेले गिफ्ट अधिक खास वाटतात. चला, नैसर्गिक आणि बजेट-फ्रेंडली असा होममेड गिफ्ट हँपर कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय द्याल? Gen Z भाऊ-बहिणींसाठी खास आयडियाज
Raksha Bandhan
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 08, 2025 | 1:50 PM

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, प्रदूषण आणि ताणामुळे त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी, नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेला एक खास होममेड स्किन केअर हँपर तुमच्या बहिणीला नक्कीच आवडेल. हा हँपर तिच्या त्वचेसाठी फायदेशीर तर ठरेलच, पण त्यात तुमचा भावनिक स्पर्शही जाणवेल. चला, एक सोपा, बजेटमध्ये बसणारा आणि नैसर्गिक स्किन केअर हँपर कसा तयार करायचा, ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

होममेड स्किन केअर हँपर कसा तयार कराल?

हा हँपर बनवणं खूप सोपं आहे. तुम्ही घरच्या काही वस्तू वापरून किंवा बाजारातून काही खास गोष्टी आणून एक सुंदर गिफ्ट बॉक्स बनवू शकता.

1. होममेड फेस स्क्रब (Face Scrub):

हँपरमध्ये सर्वात आधी नैसर्गिक फेस स्क्रब ठेवा. तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता किंवा बेसन, हळद आणि दही वापरून घरीच तयार करू शकता.

2. डीआयवाय फेस मास्क (DIY Face Mask):

हँपरमध्ये फेस मास्कचा समावेश करा. मुलतानी माती, गुलाबजल आणि कोरफडीचा गर वापरून तुम्ही घरीच नैसर्गिक फेस मास्क बनवू शकता.

3. होममेड लिप बाम (Lip Balm):

हँपरला आणखी खास बनवण्यासाठी, खोबरेल तेल आणि मध वापरून घरगुती लिप बाम तयार करा. हा रसायनमुक्तअसतो आणि जास्त काळ टिकतो.

4. बॉडी स्क्रब (Body Scrub):

शरीराची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी बॉडी स्क्रब आवश्यक आहे. तुम्ही कॉफी, साखर आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून घरच्या घरी बॉडी स्क्रब बनवू शकता.

5. इतर आवश्यक वस्तू:

तुम्ही या हँपरमध्ये सनस्क्रीन लोशन, मॉइश्चराइजर, फेस वॉश आणि सीरम यांसारख्या इतर गोष्टीही ठेवू शकता.

6. गोड सरप्राईज:

या सर्व गोष्टींसोबत हँपरमध्ये काही चॉकलेट्स ठेवल्यास ते अधिक आकर्षक दिसेल.

हँपरची पॅकिंग कशी कराल?

1. एक सुंदर बास्केट किंवा लाकडी बॉक्स निवडा.

2. त्यात आकर्षक बॉटल्स आणि जारमध्ये सगळे प्रॉडक्ट्स ठेवा.

3. प्रत्येक प्रॉडक्टवर त्याचं नाव आणि उपयोग लिहिलेले छोटे टॅग लावा.

4. हँपरमध्ये काही फुले, सुंदर रिबन आणि एक ‘हॅप्पी राखी’ कार्ड ठेवा.

5. जर तुमच्या बहिणीला मेकअपची आवड असेल, तर एक लिपस्टिक, काजल किंवा छोटा मेकअप ब्रश सेटही त्यात ठेवू शकता.

या पद्धतीने तयार केलेला होममेड स्किन केअर हँपर तुमच्या बहिणीला नक्कीच आवडेल आणि तुमच्या नात्यातील गोडवा वाढवेल.