
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचा सण आहे. या दिवशी प्रत्येक घर आनंदाने आणि उत्साहाने भरलेले असते. पण अनेकदा नकळत आपल्याकडून काही अशा चुका होतात, ज्यामुळे या गोड नात्यात कटुता येऊ शकते. नात्यातील प्रेम आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी या रक्षाबंधनाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. चला तर, ज्योतिषाचार्य अंशुल त्रिपाठी यांनी सांगितलेल्या अशा 7 गोष्टी जाणून घेऊया, ज्या या पवित्र दिवशी टाळणे आवश्यक आहे.
जर तुमच्या घरात एकापेक्षा जास्त भाऊ किंवा बहिणी असतील, तर सगळ्यांशी समान वागा. प्रेम दाखवताना किंवा भेटवस्तू देताना कोणाशीही तुलना करू नका. लहान-मोठेपणाचा भेदभाव केल्यास नात्यात कटुता येऊ शकते. सगळ्यांना समान महत्त्व दिल्यास नातं अधिक घट्ट होतं.
राखीचा अर्थ प्रेमाचा धागा आहे, महागड्या भेटवस्तूंचा नाही. भेटवस्तू किती मोठी आहे, यावर नात्याची किंमत ठरवू नका. जर भेटवस्तू लहान असेल किंवा फक्त एखादी मिठाई मिळाली, तरी त्याचा स्वीकार मनापासून करा. भेटवस्तूच्या लोभापायी नात्यातील प्रेम गमावू नका.
रक्षाबंधन हा दिवस माफ करण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा आहे. जुन्या भांडणांची किंवा वादांची आठवण करून देऊन या दिवसाचा आनंद खराब करू नका. जुन्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात केल्यास नात्यात अधिक प्रेम आणि विश्वास निर्माण होतो.
धावपळीच्या आयुष्यात एकमेकांना वेळ देणं कठीण झालं आहे. पण रक्षाबंधनच्या दिवशी फक्त राखी बांधण्याची ‘रस्म’ पूर्ण करू नका. एकत्र बसून गप्पा मारा, जुन्या आठवणींना उजाळा द्या. एकमेकांसोबत घालवलेले हे खास क्षणच नात्याला मजबूत करतात.
भाऊ-बहिणींमध्ये नकळतपणे अभ्यास, नोकरी किंवा इतर गोष्टींवरून तुलना होते, ज्यामुळे मनात ईर्ष्या निर्माण होऊ शकते. रक्षाबंधनच्या दिवशी अशा गोष्टींपासून दूर राहा. एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करा. खरा भाऊ किंवा बहीण तोच असतो, जो दुसऱ्याच्या यशावर गर्व करतो.
या दिवशी तामसिक जेवण (लसूण-कांदा किंवा मांसाहार) खाणं टाळावं. ज्योतिषाचार्यांच्या मते, यामुळे नकारात्मकता वाढते आणि नात्यात दुरावा येऊ शकतो. रक्षाबंधनच्या दिवशी सात्विक जेवण खाल्ल्यास मन शांत आणि शुद्ध राहते.
रक्षाबंधनच्या दिवशी लाल, पिवळ्या, नारंगी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालणं टाळा. यामुळे सण अधिक सकारात्मक आणि आनंदी होतो.
या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास, तुम्ही तुमच्या भाऊ-बहिणीचं नातं अधिक सुंदर आणि मजबूत बनवू शकता.