Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला चंद्रग्रहण, राखी नेमकी कधी बांधायची ?

Raksha Bandhan 2026 date : 28 ऑगस्ट रोजी चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण साजरा करताना ग्रहण काळाचा विचार करायचा की नाही ? तसेच राखी नेमकी कोणत्या मुहूर्तावर बांधायची ते वाचा...

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला चंद्रग्रहण, राखी नेमकी कधी बांधायची ?
Raksha Bandhan 2026
| Updated on: Aug 25, 2026 | 4:45 PM

Raksha Bandhan 2026: रक्षा बंधनाचा सण हा भावा – बहिणीच्या नात्याचा भावनिक सोहळा असतो. यंदा साल २०२६ मध्ये हा पवित्र सण २८ ऑगस्ट २०२६ शुक्रवारी साजरा केला जाणार आहे. या वेळी राखी पौर्णिमेलाच चंद्रग्रहण आले आहे. तसेच यंदा राखील २७ की २८ ऑगस्टला बांधायची , या दिवशी भद्राचा परिणाम असणार की नाही ?

द्रिक पंचांगानुसार रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जाणार आहे.यंदा पौर्णिमेला उदयकालीन त्रिमुहूर्त व्यापिनी असल्याने रक्षाबंधनचा सण २८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. म्हणजे बहिणी या दिवशी आपल्या भावांना राखी बांधतील आणि बंधू त्यांच्या रक्षणाचा संकल्प करत त्यांनी गिफ्ट देतील.

रक्षाबंधन

यंदा शुक्रवारी रक्षाबंधन असल्याने अनेक शुभ मुहूर्त देखील बनत आहेत. श्रावण पौर्णिमेला शतभिषा नक्षत्र, सुकर्मा योग आणि मीन राशीत चंद्राच्या स्थितीचा संयोग होत आहे. ज्योतिष दृष्टीने या संयोगांना या सणाची शुभता वाढवणारे म्हटले जात आहे.

राखी पौर्णिमेला भद्रा असणार नाही?

रक्षाबंधनाला भद्राचा विचार नेहमीच केला जातो. कारण धार्मिक मान्यतेनुसार भद्रा काळात राखी बांधणे शुभ मानले जात नाही. याच कारणाने दरवर्षी राखीची तारीख आणि मुहूर्ताचा विचार करताना भद्रा स्थिती देखील पाहिली जाते.
यंदा दिलासा म्हणजे २८ ऑगस्ट रोजी भद्राचा कोणताही प्रभाव नाही. भद्रा २७ ऑगस्ट सकाळी ९.०६ वाजता सुरु होऊन रात्री ९.२५ वाजेपर्यंत आहे. यानंतर भद्रा काळ संपतो. त्यामुळे २८ ऑगस्ट रोजी बहिणींनी भावाला राखी बांधण्यात भद्रा काळाचा कोणताही अडथळा नाही.

28 ऑगस्ट रोजी वर्षाचे अखेरचे चंद्र ग्रहण

रक्षा बंधनाच्या दिवशी २०२६ चे अखेरचे चंद्र ग्रहण लागणार आहे. हे ग्रहण सकाळी ६.५३ वा. ते दुपारी १२.३१ वाजेपर्यंत राहणार आहे. एकूण ५ तास ३८ मिनिटे इतका ग्रहणाचा काळ आहे. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात सुतक काळ पाळण्याची काही गरज नाही. राखी बांधण्यावर ग्रहण काळाची नाहक चिंता करण्याची काहीही गरज नाही.

 

Follow Us