AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची लेक अन् सुनेचा शानदार अंदाज, सारा-सानियाचा व्हिडीओ व्हायरल; नणंद-भावजयीच्या लूकने वेधलं लक्ष

सारा तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा 'गेट रेडी विद अस' व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. राखी लंचसाठी तयार होताना त्यांनी ट्विनिंग केलं. हा साधा पण क्लासी अंदाज चाहत्यांना खूप आवडला. त्यांच्यातील घट्ट नाते आणि फॅशन सेन्सचं सध्या खूप कौतुक होतंय.

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची लेक अन् सुनेचा शानदार अंदाज, सारा-सानियाचा व्हिडीओ व्हायरल; नणंद-भावजयीच्या लूकने वेधलं लक्ष
Sara Tendulakr and Saaniya Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2026 | 2:31 PM
Share

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यासोबतच त्याच्या घरचेही नेहमी चर्चेत असतात. त्याची लाडकी लेक सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar) ही तर तिच्या स्टायलिश लुक्समुळे आणि खास अंदाजामुळे लाइमलाइटमध्ये असते. तर आता तेंडुलकरांची सूनबाई, सानिया चंडोक (Saaniya Chandok Tendulkar) ही देखील नजरेत असते. नणंदबाई सार हिच्याप्रमाणेच सानियाची स्टाईलदेखील अतिशय क्लासी, एलिगंट आणि सुंदर असते. नणंद-भावजयीच्या या जोडीने नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्या दोघी लंचसाठी तयार होताना दिसल्या. पंजाबी ड्रेसमधील त्यांच्या ट्विनिंग लूकने अनेकांचं लक्ष वेधलं आणि त्यांच्या व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव झाला.

सारा तेंडुलकरची स्टाईल ही नेहमीच इंप्रेसिव्ह असते, पण सानिया ही देखील तिच्यापेक्षा कमी नाही. दोघींनीही सुंदर पद्धीतने आपला लूक ओव्हर ड्रॅमॅटिक न करता, चिकनकारी कुर्त्यात स्टायलिंग केलं. हा व्हिडीओ लोकांना बराच आवडला असून अनेकांनी कमेंट्स करत नणंद-भावजयीच्या या जोडीचं खूप कौतुकही केलं.

चिकनकारी कुर्त्यात खुलून दिसली सारा अन् सानिया

कधी वेस्टर्न तर कधी हटके देसी लुकमधून चाहत्यांची मनं जिंकणारी सारा पुन्हा एकदा आपल्या साध्या पण एलिगंट अंदाजामुळे चर्चेत आली. साराने पेस्टल ब्लू रंगाचा सुंदर चिकनकारी कुर्ता परिधान केला, त्यावर पांढऱ्या धाग्यांनी केलेली नाजूक फ्लोरल आणि बेल-बुट्यांची कढाई लक्ष वेधून घेतलं. कुर्त्याचा स्ट्रेट आणि रिलॅक्स्ड फिटने तिच्या लुकला साधेपणासोबतच ग्रेसफुल टच दिला. कुर्त्याच्या फुल स्लीव्ह्जवरही सुंदर कढाई करण्यात आली होती. मनगटाजवळील टाय-अप डिटेलिंग आणि हलकी फ्रिल फिनिश यामुळे संपूर्ण लुकमध्ये फेमिनिन टच आला. मॅचिंग ब्लू बॉटम आणि फ्लोई दुपट्ट्यामुळे साराचा मोनोक्रोम लुक आणखी खुलून दिसला.

तर सारासोबत ट्विनिंग करताना सानियानेही याच डिझाइनचा चिकनकारी कुर्ता निवडला, मात्र तिचा कुर्ता सुंदर पिंक शेडमध्ये होता. पिंक रंगावर केलेली पांढऱ्या धाग्यांच्या नाजूक एम्ब्रॉयडरीने तिच्या लुकला सॉफ्ट आणि रिच लुक दिला. मनगटाजवळील फ्रिल डिटेलिंगमुळे स्लीव्ह्जना अधिक नाजूक आणि आकर्षक लुक मिळाला. मॅचिंग पँट आणि दुपट्ट्यासोबत सानियानेही आपला संपूर्ण लुक अगदी स्टायलिश पद्धतीने पूर्ण केला. घरच्या राखी लंचसाठी दोघींचा हा ट्विनिंग लुक अगदी परफेक्ट वाटत होता.

बांगड्या आणि बिंदीने दिला देसी टच

सारा आणि सानिया या दोघींनीही आपल्या लुकच्या ॲक्सेसरीजकडेही विशेष लक्ष दिलं. स्टोन जडवलेल्या सिल्व्हर बांगड्या आणि स्टोन बिंदीमुळे साराच्या लुकमध्ये सुंदर देसी टच आला. यासोबत तिने टेनिस ब्रेसलेट, गोल्ड टोन ब्रेसलेट आणि हिरव्या रंगाचे Vintage Alhambra पेंडेंट परिधान केले होते. 18 कॅरेट सोन्यापासून तयार केलेले हे पेंडेंट तिच्या लुकचे खास आकर्षण ठरलं. सॉफ्ट कर्ल्समध्ये मोकळे सोडलेले केस आणि पिंकिश टोनमधील मेकअपने तिच्या सॉफ्ट आणि एलिगंट लुकला पूरक ठरला.

तर सानियाने देसी लुकचं स्टायलिंग मिनिमल ठेवलं.  कपाळावरील बिंदी, छोटे हूप इअररिंग्स, डायमंड रिंग आणि अर्जुनच्या ‘A’ या इनिशियल्सचे टेनिस ब्रेसलेट यांनी तिच्या लुकमध्ये खास भर घातला. यासोबत तिने साराप्रमाणेच Vintage Alhambra चे पेंडेंट परिधान केलं. मोकळे केस आणि सॉफ्ट पिंक-टोन मेकअपमुळे तिचा लुकही साधा, सुंदर आणि आकर्षक दिसत होता.

चाहत्यांनी केलं भरभरून कौतुक

सारा आणि सानियाचा हा ट्विनिंग लूक सोशल मीडियावरही लोकांना खूप आवडला. चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत दोघींचंही कौतुक केलं.’संस्कारी मुली’ अशी कमेंट एका चाहत्याने केली, तर दुसऱ्याने साराला ‘ड्रामा क्वीन’ म्हणत दोघींचं बॉन्ड खूपच सुंदर असल्याचं म्हटलं. आणखी एका चाहत्याने सानियाच्या सौंदर्याचं कौतुक करत ती खूप सुंदर दिसत असल्याचं लिहिलं.

Follow Us
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...