माझ्या आयुष्याची राखरांगोळी… सौदी अरेबियात लग्नाआधी आई होणं पडलं महागात, तुरुंगात खितपत पडलेल्या महिलेची हृदयद्रावक कहाणी

लग्नाआधी आई होणं हे अनेक देशांमध्ये बेकायदेशीर आहे. पण सौदी अरेबियात लग्नाआधी आई होणं कोणत्या गंभीर गुन्ह्यापेक्षा कमी नाही. तेथील एक महिलेने लग्नाआधी मूल जन्माला घातलं... आता ती महिला तुरुंगात खितपत पडली असून, बॉयफ्रेंड देखील देश सोडून पळून गेला आहे....

माझ्या आयुष्याची राखरांगोळी... सौदी अरेबियात लग्नाआधी आई होणं पडलं महागात, तुरुंगात खितपत पडलेल्या महिलेची हृदयद्रावक कहाणी
Kenyan Women
| Updated on: Nov 13, 2026 | 12:51 PM

Saudi Arabia Court Sentences Kenyan Women: सौदी अरेबियात लग्नाआधी मूल जन्माला घातल्यामुळे एका केनियन महिलेला 100 फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संबंधित महिली सौदी अरेबियात हाऊस हेल्प म्हणून काम करत होती. एका रिपोर्टनुसार, कोर्टाने गेल्या महिन्यात महिलेला लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे दोषी ठरवलं आहे… लग्नाआधी आई झाली म्हणून कठोर शिक्षा म्हणून कोर्टाने महिलेला 100 फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. त्याशिवाय एक वर्षाच्या हद्दपारीचा आदेशही देण्यात आला आहे. या निकालानंतर सौदी अरेबियातील महिलांचे अधिकार आणि न्यायव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

Loading...

शिक्षा झालेल्या महिलेची ओळख एस्थर वांजा मुथोनी अशी पटली आहे. एस्थर पूर्व आफ्रिकन देश केनियाची रहिवासी असून सौदी अरेबियात घरगुती कामगार म्हणून नोकरी करण्यासाठी गेलेली. समोर आलेल्या माहितीनुसार, एस्थर ‘महाराह ह्युमन रिसोर्सेस’ नावाच्या कंपनीच्या माध्यमातून कायदेशीररीत्या तेथे काम करत होती.

दुसऱ्या देशात काम करण्यासाठी गेलेल्या एस्थर हिची ओळख इजिप्तच्या मोहम्मद नावाच्या नागरिकाशी झाली. ओळखीचं काही दिवसांनी प्रेमात रुपांतर झालं आणि एस्थर गर्भवती राहिली… ऑगस्ट 2025 मध्ये महिलेने स्टाफ कॉर्टरमध्ये बाळाला जन्म दिला. याबद्दल एका सुपरवाझरला कळलं आणि त्याने एस्थर हिला रुग्णालयात नेलं. तेथे पोलिसांनी महिलेची चौकशी केली आणि तिला ताब्यात घेतलं.

पोलिसांना दिलेल्या जबाबात एस्थर हिने सांगितलं, बाळाचा बाप मोहम्मद सौदी अरेबिया सोडून निघून गेला आहे. त्याने माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली…’ पोलिसांनी सुरुवातीला महिलेची सुटका केली. त्यानंतर महिलेला आणि तिच्या बाळाला कोणीच राहण्यासाठी छत दिलं नाही. स्टाफ कॉर्टरमधून देखील तिला बाहेर काढण्यात आलं. केनियाच्या दूतावासाकडूनही तिला अपेक्षित मदत मिळाली नाही. नाइलाजाने महिललेला एका पेट्रोल पंपावर राहावं लागलं.

न्यायालयाने कोणत्या कायद्यांतर्गत शिक्षा सुनावली?

ऑक्टोबरमध्ये न्यायालयाने एस्थर हिला विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी ठरवलं. रिपोर्टनुसार, न्यायाधीशांनी इस्लामिक कायद्याच्या रूढीवादी व्याख्येच्या आधारे कुराणातील एका आयतीचा संदर्भ देत 100 फटके मारण्याचीशिक्षा सुनावली. याशिवाय न्यायालयाने तिला एक वर्षाच्या देशत्यागाचा आदेश देखील दिला आहे. मात्र, बाळाच्या बापाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली आहे की नाही, हे निकालात स्पष्ट करण्यात आलेलं नाही. याच कारणामुळे सोशल मीडियावर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us