AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्र्यांच्या घरावर हल्ला, गृहविभागाचे धिंडवडे; रोहित पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा, केली महत्त्वाची मागणी

मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला झाला. यावरून गृहविभागाचे धिंडवडे निघाल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

मंत्र्यांच्या घरावर हल्ला, गृहविभागाचे धिंडवडे; रोहित पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा, केली महत्त्वाची मागणी
rohit pawar news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 12:45 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरावर मध्यरात्री हल्ला झाल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांवर एकच संताप व्यक्त केला. आता या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मंत्रिपद असलेल्या संजय शिरसाट यांच्या घरावरच हल्ला झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी थेट गृहविभागावर तोफ डागली आहे. मंत्र्यांच्या घरावर हल्ला होत असेल, तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मंत्री शिरसाट यांच्या घरावर काल रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या प्रकरणी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करणे, दमदाटी करणे, धमकी देणे, शासकीय कामात अडथळा आणणे, मालमत्तेचे नुकसान किंवा शारीरिक इजा होईल असे कृत्य करणे, तसेच समाजात तेढ निर्माण करण्यासारखे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आलीये.

रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी 

आमदार रोहित पवार म्हणाले, ‘सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना ही धक्कादायक आणि गृहविभागाचे धिंडवडे उडवणारी आहे. राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याचं घरच सुरक्षित नसेल तर तिथं सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय, हा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक शेतकरी आक्रोश मोर्चाच्यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस प्रशासनाने उत्तम नियोजन केलं होतं, हा माझा अनुभव आहे, पण रात्री घडलेल्या घटनेच्या तपशीलाबाबत सखोल तपास झाला पाहिजे. सत्तेतील मित्रपक्षांसोबतच कठपुतळीचा खेळ खेळणाऱ्या गृहमंत्री व मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेची तरी गांभीर्याने दखल घ्यावी’.

Follow Us
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका
सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी...
NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?
संजय शिरसाटांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड