दररोज चहा पिणे तुमच्या आरोग्याला कसे हानिकारक ठरू शकते, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

चहा पिण्याचे शौकीन असलेले बरेच लोकं आहेत. पण तुम्ही ऐकले असेलच की चहा जास्त प्रमाणात पिणे आरोग्यासाठी हानिकारक असते. दररोज जास्त चहा प्यायल्याने आपल्या शरीराला कोणत्या समस्या निर्माण होतात याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

दररोज चहा पिणे तुमच्या आरोग्याला कसे हानिकारक ठरू शकते, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
tea
Image Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: May 30, 2025 | 12:43 PM

आपल्याकडे प्रत्येकाला चहा प्यायला खूप आवडते. काही लोकांची दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते. त्यातच असे काही लोकं असेही असतात ज्यांना दिवसभरात 4 ते 5 कप चहा पितात. दुधाचा चहा खूप लोकप्रिय आहे. हिवाळा असो वा उन्हाळा, चहाप्रेमींना चहा प्यायला आवडतोच. जरी आपल्याला माहित आहे की यामुळे आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते.

पण आजकाल काही लोकांनी चहा पिणे कमी केले आहे. कारण चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. दररोज चहा प्यायल्याने शरीराला कोणते नुकसान होऊ शकते याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया. तुमच्यासाठी किती प्रमाणात पिणे योग्य असेल?तेही आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

तज्ज्ञांचा सल्ला

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील मुख्य आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल सांगतात की, दररोज चहा पिणे ही अनेक लोकांची सवय झाली आहे, परंतु जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दिवसातून 2 ते 3 कप चहा पिण्यापुरते मर्यादित ठेवणे ठीक आहे, परंतु यापेक्षा जास्त चहा प्यायल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चहामध्ये कॅफिन असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास निद्रानाश, अस्वस्थता, हृदयाची गती वाढणे आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

याशिवाय, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस, अ‍ॅसिडिटी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. काही लोक दूध आणि साखरेचा जास्त चहा पितात, ज्यामुळे वजन वाढण्याचा, रक्तातील साखरेची पातळी बिघडण्याचा आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढू शकतो. जास्त चहा प्यायल्याने शरीरातील लोहाचे शोषण देखील कमी होते, ज्यामुळे अशक्तपणा म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागते.

चहा पिण्याची योग्य वेळ सकाळी नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणानंतर 1 ते 2 तासांनी असते. रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास ​आधी चहा न पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या झोपेवर परिणाम होणार नाही. हर्बल टी किंवा ग्रीन टी सारखे पर्याय मर्यादित प्रमाणात चांगले असू शकतात, परंतु ते जास्त प्रमाणात सेवन करू नये. तुम्ही दुधाचा चहा प्या किंवा ग्रीन टी, चहा हा मर्यादित प्रमाणात प्यावा. तसेच हवामानाचाही विचार करून तूम्ही चहा प्यावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)