Beauty Tips | दुधाच्या मलईने चेहरा होईल चमकदार, अशा प्रकारे करा वापर

| Updated on: Feb 10, 2021 | 5:46 PM

महिला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. पण, महागडी उत्पादने वापरल्यानंतरही काही वेळा चेहरा चमकदार दिसत नाही.

Beauty Tips | दुधाच्या मलईने चेहरा होईल चमकदार, अशा प्रकारे करा वापर
दुधाच्या मलईमध्ये असे बरेच गुणधर्म आहेत की, ज्यामुळे आपली निस्तेज त्वचा पुन्हा निरोगी आणि चमकदार दिसू शकते.
Follow us on

मुंबई : महिला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. पण, महागडी उत्पादने वापरल्यानंतरही काही वेळा चेहरा चमकदार दिसत नाही. उलट बर्‍याच वेळा महागड्या वस्तू आणि मेकअपमुळे चेहऱ्यावर अधिक सुस्तपणा दिसून येतो. कधीकधी या उत्पादनांमुळे त्वचेची आणि चेहऱ्याची हानी देखील होते. यातील रासायनिक घटकांमुळे अनेकदा त्वचेवर पुरळ देखील उठते (Skin Care Tips Milk Facial Cream For glowing skin).

आपण देखील त्वचेचा तजेला परत आणण्यासाठी वेगवेगळे उपचार घेत असाल आणि त्याचा जर काहीच उपयोग  होत नसेल, तर आम्ही आपल्याला दुधाच्या मलईचा घरगुती उपचार सांगत आहोत, ज्याचा वापर करून आपण चेहर्‍यावर नैसर्गिक चमक आणू शकता. दुधाच्या मलईमध्ये असे बरेच गुणधर्म आहेत की, ज्यामुळे आपली निस्तेज त्वचा पुन्हा निरोगी आणि चमकदार दिसू शकते. चला तर, चेहऱ्यावरचे गेलेले तेज परत आणण्यासाठी मलई कसा वापरू शकतो, हे जाणून घेऊया…

दुधाच्या मलईने स्क्रब बनवा

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, आपण प्रथम त्वचेला एक्सफोलिएट केले पाहिजे. यासाठी तांदळाच्या पिठामध्ये थोडी दुधाची मलई घाला. दोन चमचे तांदळाच्या पिठात दोन चमचे मलई मिसळावी. ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि मग हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. दोन मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. नाक आणि मानेभोवती हलका दाब घेऊन मालिश करा. जेणेकरून या ठिकाणांवरील घाण आणि मृत त्वचा सहजपणे काढून टाकली जाईल (Skin Care Tips Milk Facial Cream For glowing skin).

मलईने मसाज करा

आपण ताज्या मलईने फेस क्रीम बनवू शकता. या मलईमध्ये बरेच तेल आहे, म्हणून त्यात अधिकचे कोणतेही तेल घालण्याची गरज नाही. त्यात एक चिमूटभर हळद, एक छोटा चमचा बेसन पीठ घालून मलई फेटून घ्यावी. हे मिश्रण लावल्यानंतर चेहऱ्यावर थोडावेळ मसाज करा. सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर मसाज करा. असे केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते.

मलईने फेसपॅक बनवा

ताज्या मलईमध्ये, मध मिसळून फेस पॅक तयार करा. तो आपल्या चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस पॅक नियमित वापरल्याने तुमची त्वचा चमकू लागेल. जर आपल्याला त्वचेवर पुरळ, सनबर्न किंवा फ्रीकल समस्या असतील, तर आपण मलईने बनवलेला फेसपॅक लावू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care Tips Milk Facial Cream For glowing skin)

हेही वाचा :