Dipendar Goyal : मेंदूतील Blood Flow मोजणार छोटीशी चीप; दिपेंदर गोयल यांच्या Temple Deviceची चर्चा
Brain Blood Flow मध्ये होणारे बदल समजून घेण्यासाठी Templeसारख्या wearable technologyवर संशोधन सुरू आहे. त्यामुळे मात्र ब्रेन ट्युमर, स्ट्रोक किंवा इतर आजारांचे निदान लवकरात लवकर करता येणे शक्य आहे.

आपण आतापर्यंत शरीरातील रक्ताची चाचणी करत होतो. त्यानुसार पुढील उपचार करता येत होते. पण आता या मर्यादापलीकडे जाऊन या या चाचणीच्या पलीकडे जाऊन मेंदूमधील रक्ताचे परिक्षण करता येणार आहे.तुमचा मेंदू कसे काम करतोय? मेंदू भागात किती रक्त आहे. कोणता त्रास आहे? याची संपूर्ण माहिती एका चीप च्या आधारे आता कळणार आहे.
झोमॅटोचे फाउंडर दिपेंदर गोयल यानीहेल्थ व्हेरिएबल डिव्हाईस “टेम्पल” ही चीप नुकतीच लाँच केली. परंतु या चीपचे फायदे लोकांना माहितच नव्हते. या चीपविषयी नुकतीच दीपेंदर गोयल यांनी एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या चीप विषयी संपूर्ण माहिती शेअर केली आहे. हे चीपचे मुख्य काम मेंदूतील रक्ताची पातळी मोजणे हा आहे. हे उपकरण ८४ टक्के ९१ टक्क्यांपर्यंत थेट मेंदूतील रक्तप्रवाह अचूकपणे मोजते. आतापर्यंत लॅबमध्ये ६० लोकांवर याची यशस्वीपणे चाचणी केली आहे आणि ती चाचणी यशस्वी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या टेंपल डिव्हाईसची ६० लोकांवर लॅबमध्ये यशस्वीपणे चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान डोक्याच्या वरच्या त्वचेऐवजी (scalp) थेट मेंदूच्या आतील रक्तप्रवाह celebral blood flow ८४ टक्के ते ९१ टक्के अचूकतेने ट्रॅक करत असल्याचे समोर आले आहे. दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. असा विश्वास गोयल यांनी पोस्टव्दारे व्यक्त केला आहे.
Does @temple really monitor blood flow to the brain, or just the scalp?
In our second validation study, we tested Temple BrainFlow against time-domain NIRS, one of the few technologies that can separate brain blood volume changes from scalp blood volume changes. We had 60… pic.twitter.com/vEJqxGPiXu
— Deepinder Goyal (@deepigoyal) September 25, 2026
मेंदूचे विकारांवर योग्य वेळी करता येणार इलाज
अंतर्गत विकार लवकर कळून येत नाही, त्यामुळे आजार बळवतो. ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्युमर यांसारखे अनेक आजारांना तोंड द्यावे लागते आणि त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. पण या डिव्हाईसमुळे मेंदूचे रिअल टाईम काम समजून घेण्यास मदत होणार आहे. टेंपल हे क्लिनीकल चाचणीपुरता मर्यादीत न राहणार नाही आहे. सर्वसामान्य लोकांनाही याचा लवकरच वापर करण्यात येणार आहे. ज्यामुळे २४ तास मेंदूवर नजर राहणार आहे.
टेंम्पल डिव्हाईसची किंमत नेमकी किती आहे?
टेंपल हे मनगटावर न बांधता डोक्याच्या साईडच्या भागला लावले जाणारे एक छोटे डिव्हाईस चीप आहे.मिळालेल्या माहितीनुसार हे भारताच्या प्रीमियर हेल्थ-टेक मार्केटमध्ये याची किंमत सुमारे ७२,००० ते ८०,००० रुपये असण्याची शक्यता आहे. सध्या हे उपकरणव्दारे आणखी काही लोकांची टेस्टिंग केली जात असल्याने लवकरच ते भारतात सर्वसामान्यांसाठी लाँच केले जाणार आहे.