‘या’ सवयींमुळे दारिद्र्य येईल, ‘हे’ नियम पाळल्यास घरात लक्ष्मी नांदेल

सूर्योदयानंतर उठल्याने, घरातील जुन्या चपला, जुने कपडे किंवा घरातील नळ किंवा टाकीतून टपकणारे पाणी, अशा छोट्या-छोट्या गोष्टी देखील घरात दारिद्र्य यायला कारणीभूत ठरू शकतात. तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असावा, असं वाटत असेल तर काय करावे आणि काय टाळावे, याविषयी जाणून घ्या.

‘या’ सवयींमुळे दारिद्र्य येईल, ‘हे’ नियम पाळल्यास घरात लक्ष्मी नांदेल
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 8:05 PM

तुम्ही खूप कष्ट करतात, मेहनत घेतात पण तरीही तुमची आर्थिक परिस्थिती वर्षानुवर्ष नाजुकच रहाते, असं का होत असेल? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुदोष हे व्यक्तीच्या जीवनातील संकटे आणि दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे तुमच्या घरातील छोट्या-छोट्या चुका देखील तुमच्या आर्थिक प्रगतीमधील बाधा ठरू शकतात.

हिंदू धर्मात ज्योतिष आणि वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच लोक घर बांधण्यापासून ते घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी वास्तु आणि ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात.

वास्तु आणि ज्योतिषशास्त्रात असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम रोज पाळले पाहिजेत. बरेच लोक कष्ट करूनही गरीब राहतात आणि विचार करतात की असे का होते. पण चिंता करू नका. यावर आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कोणत्या चुकांमुळे घरात दारिद्र्य येऊ शकते जाणून घ्या.

घरात दारिद्र्य येण्याची 5 कारणे कोणती?

ब्रह्म मुहूर्तात न उठणे

ज्योतिष आणि वास्तुनुसार सूर्योदयाच्या वेळी किंवा ब्रह्म मुहूर्तापूर्वी उठणे शुभ मानले जाते. ब्रह्म मुहूर्तात उठल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि गृही लक्ष्मीचा वास होतो. असे मानले जाते की, सूर्योदयानंतर उठल्याने घरात दारिद्र्य येते, म्हणून नेहमी ब्रह्म मुहूर्तात उठले पाहिजे.

गुरुवारी केस किंवा नखे कापणे

काही लोक गुरुवार आणि एकादशीला केस आणि नखे कापतात. वास्तुशास्त्रानुसार असं करणं अशुभ मानलं जातं. गुरुवारी केस किंवा नखे कापल्याने देवी लक्ष्मी निघून जाते आणि व्यक्तीला दारिद्र्याला सामोरे जावे लागते.

घरात पाणी टपकणे

घरातील नळ किंवा टाकीतून टपकणारे पाणी अशुभ मानले जाते. घरात पाणी साचल्याने आर्थिक संकट निर्माण होते. याशिवाय सदोष इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवू नयेत. घरात वाईट किंवा जुन्या गोष्टी ठेवल्याने पैशांचे नुकसान होते. त्यामुळे घरातलं भंगार आधी रिकामं करा.

तुटलेले शूज आणि चप्पल घरात ठेवणे

तुटलेले शूज किंवा चप्पल घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तुटलेले शूज आणि चप्पल घरात ठेवू नयेत. याशिवाय फाटलेले आणि जुने कपडे घरात ठेवणेही अशुभ मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. घरातील जुने शूज आणि चप्पल तुम्ही कोणालाही दान करू शकता.

पूजा न करणे

हिंदू धर्मात पूजा, नामजप आणि उपवासाला खूप महत्त्व आहे. पण जर तुम्ही तुमच्या घरात पूजा किंवा व्रत करत नसाल तर अशा घरात देवी लक्ष्मीचा वास होत नाही, ज्यामुळे आर्थिक अडचणी सुरू होतात. यामुळे त्या व्यक्तीला दारिद्र्याला सामोरे जावे लागू शकते.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.