AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्तदाब, स्मरणशक्ती तसेच साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहेत ‘हे’ मसाले, आरोग्यासाठी फायदेशीर

मसाले हे आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहेत. भाज्यांची चव वाढवणारे मसाले आपल्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. कारण त्यात असलेले आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म रोगांचा धोका कमी करतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. तर आजच्या या लेखात तुम्हाला काही मसाले तुमच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत हे सांगणार आहोत. चला तर मग जाणुन घेऊयात...

रक्तदाब, स्मरणशक्ती तसेच साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहेत 'हे' मसाले, आरोग्यासाठी फायदेशीर
| Edited By: | Updated on: Jun 12, 2025 | 3:15 PM
Share

मसाल्यांचे भारताशी शतकानुशतके जुने नाते आहे. शाही जीरा ते दालचिनीपर्यंत, देशात अशा अनेक हर्ब्स किंवा मसाले आहेत जे वर्षानुवर्षे अन्नाची चव द्विगुणित करण्यास मदत करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की जर आरोग्याची काळजी घेण्यासाठी या मसाल्यांचे सेवन केले तर कमी वेळातच तुम्हाला उत्तम परिणाम मिळू शकतात. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की हे काही ठराविक मसाले केवळ आपल्या आतड्यांचे आरोग्य सुधारत नाहीत तर मधुमेह असलेल्या रूग्णासांसाठी त्याच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यापासून ते स्मरणशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे प्रदान करतात.

अलिकडेच एक अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये काही तरुणांना चार आठवडे 7 ग्रॅम मिश्रित हर्ब्स देण्यात आल्या. असे आढळून आले की त्यांच्या शरीरात पॉलीफेनॉल नावाचे एक संयुग आढळल्याने त्यांची पचनसंस्था मजबूत झाली आहे जे शरीरातील जळजळ कमी करते. हे संशोधन 2022 मध्ये करण्यात आले होते जे द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर 2023 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये देखील एक अभ्यास प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये काही समान परिणाम आढळले. अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब नियंत्रणासारखे सकारात्मक परिणाम आढळून आले.

ओरेगॅनो हे हर्ब्सचे मिश्रण आहे आणि जर ते योग्य पद्धतीने आहारात घेतले तर ते आरोग्य सुधारू शकते. कारण ते पोषणाचे एक पॉवरफूल केंद्र आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा काही मसाल्यांबद्दल जाणून घेऊयात जे योग्य प्रमाणात खाल्ले जाऊ शकतात आणि दीर्घकाळ एकंदर तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.

आहारात कोणत्या हर्ब्स आणि मसाल्यांचा समावेश करावा

दालचिनी आहे खूप फायदेशीर

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही दररोज दालचिनीला तुमच्या आहाराचा भाग बनवले तर ते तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणूनच, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते औषधापेक्षा कमी नाही. 2024 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील एका अहवालात असे आढळून आले की ज्यांना मधुमेहापूर्वीची लक्षणे आहेत त्यांनी दररोज अर्धा चमचा दालचिनी पावडर नक्कीच खावी. महिनाभर असे केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

हळदीचे आहेत अनेक फायदे

हळद केवळ आपल्या पदार्थांचा रंगच वाढवत नाही तर त्याचे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक असतो जो जळजळ कमी करण्यास मदत करतो. दररोज 8 ग्रॅम हळद भाज्यांसोबत किंवा रिकाम्या पोटी पाण्यात मिसळून पिण्याचे अनेक फायदे आहेत.

अदरक आरोग्यासाठी फायदेशीर आहे

आपल्यापैकी फार कमी लोकांना अदरकचे फायदे माहित असतील, जे भारतीय घरांमध्ये दररोज चहामध्ये वापर केला जातो. त्यात असलेले जिंजरोल्स आणि सोजिओल्स जळजळ आणि मळमळ यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की ते गर्भधारणेदरम्यान आणि केमोथेरपी दरम्यान होणाऱ्या मळमळण्याच्या समस्येला कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही ताजे अदरक वापरत असाल तर ते सोलण्याची गरज नाही.

लवंग दातदुखीपासून देते आराम

लवंग नेहमीच नैसर्गिक उपाय म्हणून वापरले जाते. ते दातदुखी कमी करण्यास देखील मदत करते. तर लवंग जेल हे 20 टक्के जास्त प्रभावी आहे. लवंगामध्ये आढळणारे युजेनॉल नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...