World Travel & Tourism फेस्टिव्हलचं आज सूप वाजणार, AI पासून ट्रॅव्हल ट्रेंडपर्यंत… खास आकर्षण काय?

नवी दिल्लीत द वर्ल्ड ट्रव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल सुरू आहे. आज या फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस आहे. टीव्ही9 नेटवर्कने रेड हॅट कम्युनिकेशनच्या सहकार्याने या मेगा इव्हेंटचं आयोजन केलेलं आहे. या अत्यंत आगळ्यावेगळ्या इव्हेंटला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या इव्हेंटला भेट देणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे.

World Travel & Tourism फेस्टिव्हलचं आज सूप वाजणार, AI पासून ट्रॅव्हल ट्रेंडपर्यंत... खास आकर्षण काय?
World Travel & Tourism
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 16, 2025 | 1:10 PM

नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये गेल्या तीन दिवसांपासून वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल सुरू आहे. आज या फेस्टिव्हलचा समारोप होणार आहे. टीव्ही9 नेटवर्कने रेड हॅट कम्युनिकेशनच्या सहकार्याने या मेगा इव्हेंटचं आयोजन केलं आहे. लोकांनी या इव्हेंटला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. दिल्लीत अत्यंत वेगळा इव्हेंट होत असल्याने नागरिकांमधून टीव्ही9 नेटवर्कच्या अभिनव कल्पनेचंही कौतुक होत आहे. आज या सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे. आजही भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये हा फेस्टिव्हल सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत या ठिकाणी वर्कशॉप्स, पॅनल डिस्कशन आणि प्रसिद्ध गायक आणि संगितकार पॅपोन यांचा लाइव्ह परफॉर्मन्स पार पडला. आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. आज तिसऱ्या दिवशी काय काय खास असणार आहे यावर एक नजर टाकूया.

World Travel & Tourism

नवी दिल्लीतील वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हलचा आज शेवटचा दिवस आहे. या तीन दिवसीय महोत्सवात AI-आधारित बुकिंग प्लॅटफॉर्म, व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी ट्रॅव्हल अनुभव आणि स्मार्ट ट्रॅव्हल गॅजेट्ससारख्या नवीन तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. कार्यशाळा, पॅनल चर्चा आणि लाईव्ह परफॉर्मन्स यासारखे विविध कार्यक्रम या महोत्सवात सादर करण्यात आले आहेत. टीव्ही9 आणि रेड हॅट कम्युनिकेशन यांनी या मेगा इव्हेंटचे आयोजन केले आहे.

शेवटच्या दिवशी काय?

आज या सोहळ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी ट्रॅव्हल इंडस्ट्रितील टेक्नॉलॉजीच्या भूमिकेबाबत चर्चा केली जाणार आहे. याशिवाय वर्कशॉप्स, पॅनल डिस्कशन आणि लाइव्ह कॉम्पिटिशन सुद्धा होणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे. उदा-

व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी ट्रॅव्हल एक्सपिरियन्स

AI बुकिंग प्लॅटफॉर्म

स्मार्ट ट्रॅवल गॅजेट्स

तर फेस्टिव्हलचा तिसरा दिवस तुम्ही सुद्धा मिस करू नका. कारण या ठिकाणी आल्यावर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती मिळणार आहे. ही माहिती तुमच्यासाठी खासच असणार आहे.