Curd Face Pack : दह्यापासून बनवलेले हे फेस पॅक वापरा आणि चमकदार त्वचा मिळवा

| Updated on: Aug 30, 2023 | 5:38 PM

दह्यामध्ये अनेक पोषक तत्वं असतात, त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रोटीन अशी अनेक महत्वपूर्ण तत्वं असतात. त्याच्या नियमित सेवनाने आजारांपासून संरक्षण होते. तसेच चेहऱ्यासाठी देखील दह्याचा वापर फायदेशीर ठरतो.

Curd Face Pack : दह्यापासून बनवलेले हे  फेस पॅक वापरा आणि चमकदार त्वचा मिळवा
Follow us on

नवी दिल्ली |30 ऑगस्ट 2023 : दही (curd) आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामध्ये असलेली व्हिटॅमिन – सी हे आरोग्याचे अनेक समस्यांपासून संरक्षण करते. तसेच दही हे त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते. त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम सारखी पोषक तत्वं असतात. जी त्वचेसाठी (skin care) लाभदायक असतात. दह्याचा वापर करून तुम्ही फेसपॅक बनवू शकता. तो लावल्याने त्वचेच्या समस्यांपासून सुटका होऊ शकते.

दही व मधाचा फेसपॅक

हा फेसपॅक ड्राय स्किनसाठी अत्यंत उपयोगी ठरतो. तो बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये 2 मोठे चमचे दही घेऊन त्यात एक मोठा चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, आणि 15-20 मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

दही व बेसनाचा फेसपॅक

ज्यांना तेलकट त्वचेची समस्या आहे त्यांनी हा फेसपॅक जरूर वापरावा. यासाठी दोन चमचे दह्यात एक चमचा बेसन मिसळा. या मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार करून ती चेहऱ्यावर लावावी, वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

दही व हळद

हा फेसपॅक लावल्याने तुमची त्वचा चमकदार होईल. हा फेसपॅक बनवण्यासाठीबाऊलमध्ये दह्यात अर्धा चमचा हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. साधारण 15 मिनिटांनी पाण्याने धुवून टाका.

दही व लिंबाचा फेसपॅक

यामुळे त्वचेचा रंग उजळू शकतो. हा पॅक बनवण्यासाठी थोड्या दह्यात लिंबाचा रस घाला. एकत्र करून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने पाण्याने धुवा.

दही व ओट्सचा फेसपॅक

ओट्समध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. ओट्स दह्यात मिसळून तो पॅक चेहऱ्यावर लावा. साधारण 15-20 पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या फेसपॅकमुळे ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स पासून मुक्ती मिळू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)