
लग्नाचा दिवस म्हणजे आयुष्यातील सर्वात खास आणि लक्षवेधी क्षणांपैकी एक. या दिवशी प्रत्येक नवरी-नवरदेव आकर्षक, आत्मविश्वासपूर्ण आणि ग्लॅमरस दिसावा अशी इच्छा असते. कपड्यांची निवड जितकी महत्त्वाची, तितकाच त्यांचा रंगसुद्धा! तुम्ही तुमच्या त्वचेच्या रंगाशी सुसंगत रंग निवडला, तर केवळ सौंदर्य खुलत नाही, तर तुम्ही कॅमेरासमोरही झळकता. चला जाणून घेऊ, स्किन टोननुसार कोणते रंग तुमच्यावर सर्वाधिक खुलून दिसतात.
१. गोऱ्या रंगासाठी:
तुमचा स्किन टोन जर गोरा किंवा उजळ असेल, तर तुमच्यावर अनेक रंग खुलून दिसतात.
नवरदेवासाठी: तुम्ही ब्राईट हिरवा, नेव्ही ब्लू, वाईन, चॉकलेटी किंवा अगदी चमकदार जांभळ्या रंगाची शेरवानी निवडू शकता. हे गडद आणि तेजस्वी रंग तुमच्या गोऱ्या रंगाला अधिक उठाव देतील.
नवरीसाठी: तुमच्यासाठी रूबी रेड, टोमॅटो रेड, मरून, डार्क पिंक किंवा राणी कलर, सिल्व्हर, गोल्डन, मेटॅलिक ब्लू किंवा लव्हेंडर असे रंग खूप सुंदर दिसतील. हे रंग तुम्हाला एक रॉयल आणि फ्रेश लुक देतील.
२. गव्हाळ किंवा सावळ्या रंगासाठी:
भारतात अनेकांचा स्किन टोन गव्हाळ किंवा सावळा असतो. तुमच्यासाठी थोडे उबदार आणि Earthy Tones असलेले रंग जास्त चांगले दिसतात.
नवरदेव आणि नवरीसाठी: तुम्ही भडक केशरीऐवजी बर्न्ट ऑरेंज, पिवळा, लाल, मॅजेंटा पिंक, पीच किंवा फिकट गुलाबी रंगांचे कपडे निवडू शकता. मीडियम किंवा डस्की टोनवर रॉयल ब्लू आणि डस्की पिंक हे रंगही छान दिसतात. हे रंग तुमच्या त्वचेच्या रंगासोबत छान मिसळून जातात आणि तुम्हाला एक आकर्षक लुक देतात.
३. गडद किंवा काळ्या सावळ्या रंगासाठी:
तुमचा स्किन टोन जर गडद असेल, तर योग्य रंगाची निवड तुम्हाला खूप क्लासी Classy आणि Elegant लुक देऊ शकते.
नवरदेवासाठी: खूप जास्त भडक किंवा चमकदार रंग टाळलेले बरे. त्याऐवजी तुम्ही Subtle Grey, काळा किंवा डीप नेव्ही ब्लू रंगाची निवड करू शकता. हे रंग तुम्हाला एक भारदस्त लुक देतील.
नवरीसाठी: तुम्ही Cool Undertones किंवा गडद, रिच कलर्स निवडू शकता. जसे की, डीप रेड, मॅजेंटा, नेव्ही ब्लू किंवा डार्क पर्पल. हे रंग तुमच्या स्किन कलरला दाबत नाहीत, उलट त्याला अधिक तेजस्वी आणि आकर्षक बनवतात.
अतिरिक्त टिप्स:
फॅब्रिक: सिल्क, वेलवेट यांसारखे रिच फॅब्रिक्स साधारणपणे सर्वच स्किन टोन्सवर चांगले दिसतात.
Accessories: दागिन्यांची निवड करतानाही स्किन टोन लक्षात घ्या. गोऱ्या रंगावर सिल्व्हर किंवा प्लॅटिनम छान दिसतं, तर गव्हाळ किंवा गडद रंगावर गोल्ड किंवा रोझ गोल्ड अधिक खुलून दिसतं.