शाकाहारी-मांसाहारी आहारातले फायदे-तोटे काय ? मांसाहार अधिक केल्याने गंभीर आजार जडण्याची शक्यता

| Updated on: Mar 16, 2022 | 6:00 AM

अभ्यासाच्या निकालात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. नियमित मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत, ज्यांनी कमी मांस खाल्ले त्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा धोका 2 टक्के कमी होता.

शाकाहारी-मांसाहारी आहारातले फायदे-तोटे काय ? मांसाहार अधिक केल्याने गंभीर आजार जडण्याची शक्यता
file photo
Image Credit source: Pixabay
Follow us on

मुंबई – अनेकांना शाकाहारी (vegetarian) आहार घ्यायला आवडतो. कारण शाकाहारी आहार अत्यंत हलक्या पद्धतीचा असतो. त्याचबरोबर तो पचनाला (Digestion) सुध्दा हलका असतो. शाकाहारी आहाराचे फायदे तुम्ही खूप देखील ऐकले असतील. शाकाहारी आहार हा सर्वात आरोग्यदायी आहार आहे जो कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाची पातळी कमी करतो. उच्च रक्तदाब, चयापचय रोग, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाच्या जोखमीपासून संरक्षण करते असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. FSSAI देखील लोकांना वनस्पती सर्वोत्तम आहाराच्या फायद्यांबद्दल वारंवार जागरूक करत असते. आता एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, मांसाहार करणार्‍यांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये कर्करोगाचा (cancer) धोका खूपच कमी असतो.

4 लाख 50 हजार लोकांवर अभ्यास

4 लाख 50 हजार लोकांवर केलेला हा अभ्यास बीएमसी मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. या सर्व लोकांना मांस आणि मासे खाल्लेल्या प्रमाणाच्या आधारावर विभागले गेले. अभ्यासात, नियमित मांस खाणाऱ्यांना विशेष श्रेणीत विभागले गेले. उदाहरणार्थ, किती लोकांनी प्रक्रिया केलेले मांस, लाल मांस किंवा चिकन आठवड्यातून पाचपेक्षा जास्त वेळा खाल्ले आणि किती लोकांनी त्यापेक्षा कमी खाल्ले. या अभ्यासात अशा लोकांचेही विश्लेषण करण्यात आले जे मांस खात नाही तर मासे खात होते. दुसर्‍या गटात असे लोक होते जे पूर्णपणे शाकाहारी होते. हा अभ्यास वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च यूके आणि ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ यांनी केला आहे.

मासे खाणाऱ्यांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका 20 ते 31 टक्के

अभ्यासाच्या निकालात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. नियमित मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत, ज्यांनी कमी मांस खाल्ले त्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा धोका 2 टक्के कमी होता. हा धोका फक्त मासे खाणाऱ्यांमध्ये 10 टक्के आणि शाकाहारी लोकांमध्ये 14 टक्क्यांनी कमी झाला. नियमित मांसाहार करणाऱ्यांपेक्षा कमी मांसाहार करणाऱ्यांना कोलन कॅन्सरचा धोका 9 टक्के कमी असतो. शाकाहारी महिलांना रजोनिवृत्तीनंतरचा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका नियमित मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत 18 टक्के कमी असतो. त्याच वेळी, शाकाहारी आणि मासे खाणाऱ्यांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका 20 ते 31 टक्के कमी असल्याचे दिसून आले.

गेल्या सात वर्षात मोदी सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय केले?; सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या ‘त्यांना’ नोकऱ्यांचे आमिष तुम्हीच दाखविलेले

Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प नामंजूर, शिक्षण क्षेत्रातील दुर्मिळ घटना

Video : ‘आई-बापावर बोलायचं नाही…’, लोकसभेत सुप्रिया सुळे संतापल्या! केंद्रीय मंत्र्यांना सुनावले खडेबोल