
नवी दिल्ली – चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही सामान्य बाब झाली आहे. बहुतांश लोक याला ब्लॅक पिंपल्स नावाने ओळखतात. मात्र तुम्ही कधी व्हाइट पिंपल्सचे (white pimples) नाव ऐकले आहे का ? वाचून हैराण झालात ना. व्हाइट पिंपल्सना मिलिया असेही म्हटले जाते, जे साधारणत: नाक, गाल व हनुवटीवर दिसतात. व्हाइट पिंपल्स हे केराटिन बिल्डअप किंवा त्वचेच्या (skin) आतल्या भागात अडकलेल्या स्किन फ्लेक्समुळेही होऊ शकतात. यांच्यापासून बचाव कसा करावा (how to prevent it), हे जाणून घेऊया.
काय आहे व्हाइट पिंपल्स येण्याचे कारण ?
सूर्य किरणांमुळे होणारे नुकसान, स्किन रिसर्फेसिंग प्रोसेस, ब्लिस्टरिंग इंज्युरी किंवा स्किन कंडीशनमुळे प्रौढ व्यक्तींच्या त्वचेवर व्हाइट पिंपल्स येऊ शकतात. जेव्हा आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याची क्षमता गमावू लागते तेव्हा मिलिया म्हणजे व्हाइट पिंपल्स येण्याची शक्यता असते. व्हाइट पिंपल्स हे दोन प्रकारचे असतात – प्रायमरी व सेकेंडरी व्हाइट पिंपल्स. हे पिंपल्स कसे रोखावेत, याचे उपाय जाणून घेऊया.
वाफ घेणे
तुमच्या त्वचेची छिद्र भरलेली व कठीण असतील, तर ती मोकळी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, वाफ घेणे. त्यामुळे त्वचेची छिद्र उघडतात व सर्व घाण बाहेर पडते. तुम्ही आठवड्यातून 2 वेळा वाफ घेऊ शकता.
क्लींजिंग
क्लींजिंगमुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, प्रदूषण व इतर घाण स्वच्छ होते. यामुळे केवळ त्वचेची छिद्रच साफ होत नाही तर ते (क्लींजिंग) एपिडर्मिस व डर्मिसही स्वच्छ करते.
फेशिअल पील
त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फेशिअल पीलचा वापर केला जातो. खरंतर हे एक केमिकल सोल्यूशन आहे, जे चेहऱ्यावर लावले जाते. त्यामुळे जुन्या स्किन सेल्स निघून जातात व नव्या स्किन सेल्स (पेशींची) निर्मिती होते.
सनस्क्रीनचा करा वापर
वाढत्या वयासोबतच आपल्या त्वचेचे वयही वाढते. अशा परिस्थितीत सूर्याच्या धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचा स्वत:चे संरक्षम करू शकत नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी अथवा निगा राखण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.