AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेडरूमखाली गुपचूप ही गोष्ट शिंपडा… मग काय होतं ते पाहा? रात्रभर तुम्हाला…

दिवसभराच्या कामानंतर रात्री अंथरूणावर कधी एकदा झोपतो असे होते. पण जेव्हा झोपेचा प्रहर येतो. त्यावेळी हा प्राणी झोपेचे खोबरे करतो. अंगाला खाज सुटते आणि तिथं लाल चट्टे पडतात. झोप न झाल्याने चिडचिड वाढते.

बेडरूमखाली गुपचूप ही गोष्ट शिंपडा... मग काय होतं ते पाहा? रात्रभर तुम्हाला...
| Updated on: Jul 24, 2025 | 4:48 PM
Share

What Kills Bed Bugs Instantly: दिवसभराचा शीण घालवण्यासाठी अनेक जण बिछाना जवळ करता. कॉटवरच्या मुलायम गादीवर कधी एकदा झोपतो असे अनेकांना होते. कामाचा थकवा घालवण्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. पण झोप घ्यायची वेळ येताच गादी खाली लपलेले ढेकूण सर्व बाजूंनी हल्ला करतात आणि झोपेचे खोबरे होते. अंगाला खाज सुटते आणि तिथं लाल चट्टे पडतात. झोप न झाल्याने चिडचिड वाढते. तुम्ही घरच्या या उपायांनी ढेकूण पळवून लावू शकता.

कुठे लपतात ढेकूण?

ढेकूण हे गादीत, कॉटच्या फटीत, कोपऱ्यात, खुर्चीत, कपाटाच्या फटीत लपतात. त्यांची संख्या दिवसागणिक वाढते. ते चावल्याशिवाय साध्या डोळ्यांनी लवकर दिसत नाहीत. ते सांदाडात लपतात. त्यामुळे त्यांना शोधणे अवघड होते. बाजारातील केमिकल स्प्रे थोडावेळ उपयोगी ठरतात. पण पुन्हा ढेकण दिसतातच.

काय आहे घरगुती उपाय

बेकिंग सोडा आणि टेलकम पावडर

प्रत्येकाच्या घरात दोन घरगुती वस्तू बेकिंग सोडा आणि टेलकम पॉवडर असते. या दोन वस्तूंचा वापर करून तुम्ही ढेकणांपासून सुटका करून घेऊ शकता. हे पदार्थ वापरण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.

असा वापरा बेकिंग सोडा

सर्वात अगोदर घरातील गादी, उशी, आणि आसपासचे फर्निचर बाहेर काढा. ते स्वच्छ करून घ्या. त्यामुळे ढेकणं आणि त्यांची अंडी बाहेर काढता येतील. त्यानंतर आता एखाद्या निमुळते तोंड असलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत बेकिंग सोडा घ्या आणि तो गादी, उशीवर शिंपडा. फर्निचरच्या फटीत हा बेकिंग सोडा पोहचेल याची दक्षता घ्या. काने-कोपरे, अंधारलेला भाग, फटीमध्ये बेकिंग सोडा शिंपडा. बिछान्याच्या चारही बाजूंना आणि बेडखालील भागात आवर्जून बेकिंग सोडा शिंपडा.

हे मिश्रण काही तास तसेच राहू द्या अथवा रात्रभर तसेच राहू द्या. आता सकाळी गादी आणि फर्निचर पुन्हा नीट झाडा, स्वच्छ करा. जर गादीतून वास येत असेल, तर टेलकम पावडर हलक्या हाताने शिंपडा. यामुळे वास कमी होईल आणि सुगंध दरवळेल.

या टिप्स पडतील उपयोगी

  • आठवड्यातून एकदा गादी उन्हात ठेवा
  • बेडशीट आणि पिलो कव्हर्स गरम पाण्यात धुवा
  • फर्निचरच्या फटी आणि भेगांमध्ये दर काही दिवसांनी बेकिंग सोडा वापरा
  • पण जर ढेकणं प्रमाणाबाहेर असतील तर पेस्ट कंट्रोल करून घ्या
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.