जर तुम्ही एकाच वेळी 50 अंडी खाल्लीत तर काय होईल? सत्य जाणून धक्का बसेल

अंडी पौष्टिक असतात. अंड्यातील प्रथिने, कॅलरीज, जीवनसत्त्वे शरीरासाठी अतिशय महत्त्वाची असतात. अनेकांना एकापेक्षा जास्त अंडी खाण्याची सवय असते. किंवा त्यांचा तो खुराक असतो. काहीजण 10 ते 12 अंडीही खातात. पण जर एखाद्याने 50 अंडी खाल्ली तर काय होईल? जाणून धक्का बसेल.

जर तुम्ही एकाच वेळी 50 अंडी खाल्लीत तर काय होईल? सत्य जाणून धक्का बसेल
What will happen if you eat 50 eggs at once? You will be shocked to know the truth
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2025 | 8:29 PM

अंडी आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. कारण अंडी हा पोषणाचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. अंड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने, नऊ अमीनो आम्ल, जीवनसत्त्वे A,B,B12,D,E,फोलेट, सेलेनियम आणि ओमेगा-3 असतात. हे सर्व घटक शरीराच्या स्नायू, रोगप्रतिकारक शक्ती आणि मेंदूसाठी आवश्यक मानले जातात. पोषणाचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो.

एखाद्याने एका वेळी 50 अंडी खाल्ली तर…

पण आपण अनेकदा हे ऐकलं असेल की काही व्यक्ती एका वेळी 5 ते 6 अंडी खातात. तर एखादी व्यक्ती एका वेळेला 10 ते 12 अंडी खाऊ शकते? तर काहीजण चक्क 20 अंडी खाण्याचा दावा करतात. पण कधी कल्पना केली आहे ,की जर एखाद्याने एका वेळी 50 अंडी खाल्ली तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? काय होऊ शकतात शरीरात बदल.

मानवी पोट 50 अंडी पचवू शकतं का?

तज्ञांच्या मते, मानवी पोट 50 अंडी पचवू शकतं परंतु हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त आहे. पण कधी कधी प्रथिने आणि कॅलरीजचे अतिप्रमाणामुळे पोटावर ताण येऊ शकतो. त्यामुळे पोट फुगणे, आम्लता, गॅस आणि पचन समस्या उद्भवू शकतात. एकाच वेळी इतकी अंडी खाल्ल्याने पोषक तत्वांचे योग्य शोषण रोखले जाते आणि त्याचा विपरित परिणाम यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेसाठी होतो. शिवाय, एवढंच नाही तर एकाच वेळी 50 अंडी खाल्ल्याने एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.

उत्तर प्रदेशात 50 अंड्यांची पैज अन् व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एका व्यक्तीला पैज लावल्याने आपला जीव गमवावा लागला. पैज अशी होती की जो कोणी एकाच वेळी 50 अंडी खातो त्याला 2000 रुपये मिळतील. एका व्यक्तीने पैज स्वीकारली आणि तो 50 अंडी खाऊ लागला. तथापि, 42 वे अंडे खाल्ल्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अंडी किती प्रमाणात खावीत?

बहुतेक निरोगी लोकांसाठी, दिवसातून एक ते दोन अंडी खाणे पुरेसे आणि सुरक्षित मानले जाते. ज्यांना शरीराची वाढ होत आहे किंवा ज्यांना जास्त प्रथिने आवश्यक असतात ते कधीकधी तीन अंडी खाऊ शकतात. शिवाय, उकडलेले, हलके तळलेले अंडी खाणे अधिक फायदेशीर मानले जातात. तथापि, जास्त तेलात तळलेला , मसालेदार अंडी खाणे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकते.