चहा पत्तीच्या मदतीने मिळवा काळे केस, घरबसल्या तयार करा ‘ही’ रेसिपी!

| Updated on: Aug 13, 2023 | 4:30 PM

काळे केस काळे करण्यासाठी चहाची पाने आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. चहा हे भारतात पाण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे, त्याच्या मदतीने केस काळे का करू नये? हे काम अतिशय सोपे असून घरबसल्या ही रेसिपी अवलंबता येते.

चहा पत्तीच्या मदतीने मिळवा काळे केस, घरबसल्या तयार करा ही रेसिपी!
white hair problems
Follow us on

मुंबई: सुंदर आणि तरुण दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यासाठी केस काळे असणे आवश्यक असते, पण हल्ली वयाच्या २० ते २५ व्या वर्षी डोक्यावर पांढरे केस यायला लागतात. सहसा आपली विचित्र जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर खाण्यापिण्याच्या सवयी याला कारणीभूत असतात. यामुळे अनेक तरुणांना लाज वाटते, कमी आत्मविश्वासाला सामोरे जावे लागते. मात्र आता आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे डोक्याचे केस पुन्हा काळे होतील.

चहाच्या पानांच्या मदतीने मिळवा काळे केस

काळे केस काळे करण्यासाठी चहाची पाने आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. चहा हे भारतात पाण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे, त्याच्या मदतीने केस काळे का करू नये? हे काम अतिशय सोपे असून घरबसल्या ही रेसिपी अवलंबता येते.

केसांना चहाची पत्ती कशी लावावी?

  1. चहाची पत्ती थेट केसांना लावली जात नाहीत, तर त्याचे पाणी वापरले जाते.
  2. यासाठी गॅस स्टोव्हवर भांडे ठेवून पाणी टाकून ते उकळावे.
  3. आता त्यात ४ ते ५ चमचे चहाची पाने घालून पुन्हा ५ मिनिटे उकळून घ्या.
  4. त्याचा परिणाम जास्त व्हावा असं वाटत असेल तर 1 कप कॉफी मिक्स करा
  5. आता हे मिश्रण उकळून घ्या म्हणजे पाणी अर्धे होईल.
  6. आता गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी सोडा
  7. आता या चहाच्या पाण्याने केस धुवा, शॅम्पू लावू नका.
  8. आता तुम्ही आठवड्यातून 2 वेळा ही प्रक्रिया करून पाहू शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)