हिवाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत वाईट आहेत ‘या’ 7 सवयी, चुकूनही दुर्लक्ष करू नका
हिवाळा सुरु झाल्यानंतर अनेक आजार डोकं वर काढतात. कारण वातावरणात मोठे बदल होतात. अशात तुम्ही स्वतःच्या 7 सवयी ज्या आहेत, त्या बदलल्या पाहिजे... या 7 गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका.

हिवाळा सुरू होताच वातावरणात अनेक बदल होतात. ज्याचा त्रास फक्त लहान मुलांनाचन नाही तर मोठ्यांना देखील होतअ असतो. सकाळ आणि रात्रीच्या थंडीत वाढ झाल्यामुळे काही लोकांना सर्दी, खोकला, घसादुखी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि दमा व इतर श्वसनविकारांनी ग्रस्त असलेल्यांनी या काळात अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. हिवाळ्यात आपण करत असलेल्या काही सामान्य चुका आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी कोणत्या टिप्स पाळाव्यात, असे मेडफर्स्ट ईएनटी सेंटरचे डॉ. राजेश भारद्वाज सांगतात. तर जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात.
हवामानानुसार योग्य कपडे न घालणे : सकाळी आणि रात्री बाहेर जाताना तुम्ही उबदार कपडे घालावेत. थंडीच्या तीव्रतेनुसार कपड्यांचे थर घालणं उत्तम ठरते.
कमी पाणी पिणे : हिवाळ्यात तुम्हाला तहान लागत नसली तरी, तुमच्या शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या घशातील आणि नाकातील त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळे, तुम्ही दिवसभर भरपूर पाणी आणि इतर द्रवपदार्थ प्यायला पाहिजेत.
हाताच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे : बाहेरून घरी आल्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. घाणेरड्या हातांनी आपले डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
खोलीत हवेच्या अभिसरणाला परवानगी न देणे : थंडीमुळे खिडक्या सतत बंद ठेवणं योग्य नाही. शक्य असेल तेव्हा, खोलीत ताजी हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. यामुळे घरातील हवेची गुणवत्ता सुधारू शकते.
आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे : शिंका येणं, घसा खवखवणे, खोकला आणि ताप यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जर ही लक्षणे वाढली किंवा जास्त काळ टिकून राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
झोप आणि अन्नाकडे दुर्लक्ष करणं : पुरेशी झोप न मिळणं आणि पौष्टिक अन्न न खाणं यामुळे शरीराच्या सामान्य रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. फळे, भाज्या आणि संतुलित आहाराला प्राधान्य दिलं पाहिजे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे
सर्दी किंवा खोकला झाल्यावर स्वतःहून अँटिबायोटिक्स घेणं योग्य नाही. सर्दी बहुतेकदा विषाणूंमुळे होते. अँटिबायोटिक्स विषाणूंवर प्रभावी नसतात. औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरावीत.
कोणाला अधिक सावधगिरीची गरज आहे?
दमा, सीओपीडी, हृदयरोग किंवा कमजोर रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी हिवाळ्याच्या महिन्यांत अधिक काळजी घ्यावी. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक लसीकरण करून घेतल्यास काही विशिष्ट संसर्गांचा धोका कमी होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणं, तीव्र ताप येणं किंवा प्रकृती खालावणं यांसारखी लक्षणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. हिवाळ्याच्या महिन्यांत निरोगी राहण्यासाठी उबदार कपडे घालणं, भरपूर पाणी पिणे, स्वच्छता राखणं आणि झोपेच्या चांगल्या सवयी लावणं महत्त्वाचं आहे.