किसण्याची झंझट विसरा! कुकरमध्ये बनवा चमचमीत गाजराचा हलवा आणि वेळ वाचवा

Gajar Halwa: हिवाळा सुरू झाला की बाजारात लाल आणि ताजी गाजरे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. अनेकांचा गाजरचा हलवा बनवण्याचा बेत असतो. पण किसायचा कंटाळा येत असल्यामुळे अनेक जण हलवाच बनवत नाहीत. पण तुम्ही कुकरमध्ये फार कमी वेळात गाजरचा हलवा बनवू शकता.

किसण्याची झंझट विसरा! कुकरमध्ये बनवा चमचमीत गाजराचा हलवा आणि वेळ वाचवा
| Updated on: Nov 29, 2026 | 2:40 PM

हिवाळा सुरू झाला की बाजारात लाल आणि ताजी गाजरे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. या दिवसांत गरमागरम गाजराचा हलवा खाण्याची मजा काही औरच असते. देशी तूप, दूध, मावा आणि सुकामेव्याने तयार केलेला गाजराचा हलवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. मात्र, हा हलवा बनवताना गाजर किसण्यासाठी बराच वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अनेकजण घरी गाजराचा हलवा बनवणे टाळतात. पण आता तुम्हाला गाजर किसण्याची अजिबात गरज नाही. प्रेशर कुकरच्या मदतीने अगदी कमी वेळात तुम्ही चविष्ट गाजराचा हलवा तयार करू शकता.

गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

Loading...

1 किलो ताजी लाल गाजरे

500 मिली फुल क्रीम दूध

100 ग्रॅम मावा

1 चमचा वेलची पूड

3 ते 4 बदाम (बारीक चिरलेले)

3 ते 4 काजू (बारीक चिरलेले)

2 मोठे चमचे मनुका

2 मोठे चमचे बारीक चिरलेले सुके खोबरे

चवीनुसार साखर

आवश्यकतेनुसार साजूक तूप

प्रेशर कुकरमध्ये गाजराचा हलवा बनवण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम गाजरे स्वच्छ धुऊन त्यांची साल काढा. त्यानंतर गाजर किसण्याऐवजी त्यांचे मोठे तुकडे करून घ्या. यामुळे गाजर किसण्याचा वेळ वाचेल. गॅसवर प्रेशर कुकर ठेवून त्यात एक मोठा चमचा साजूक तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर गाजराचे तुकडे घालून कुकरचे झाकण बंद करा. मध्यम आचेवर एक शिट्टी होईपर्यंत शिजवा. कुकरमधील वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर झाकण उघडा. गाजरे मऊ झाली असल्यास मॅशर किंवा चमच्याच्या साहाय्याने ती व्यवस्थित मॅश करून घ्या.

आता मॅश केलेल्या गाजरांमध्ये अर्धा लिटर फुल क्रीम दूध घाला. मंद किंवा मध्यम आचेवर दूध थोडे आटेपर्यंत मिश्रण शिजवा. त्यानंतर चवीनुसार साखर घालून चांगले एकजीव करा. दूध आटल्यानंतर मिश्रणात १०० ग्रॅम मावा घाला. चमच्याने सतत ढवळत राहा, जेणेकरून मावा व्यवस्थित मिसळेल आणि हलव्याला छान घट्टपणा येईल.

दुसऱ्या पातेल्यात एक चमचा तूप गरम करून त्यात बदाम, काजू, मनुका आणि सुके खोबरे घाला. हे सर्व साहित्य सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. सुकामेवा न भाजताही थेट हलव्यामध्ये घालू शकता. शेवटी भाजलेला सुकामेवा आणि वेलची पूड हलव्यामध्ये घालून व्यवस्थित मिसळा. काही वेळ मंद आचेवर शिजवल्यानंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे गाजर न किसता, अगदी सोप्या पद्धतीने प्रेशर कुकरमध्ये स्वादिष्ट गाजराचा हलवा तयार होईल. वरून थोडा सुकामेवा आणि तूप घालून हा हलवा गरमागरम सर्व्ह करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us