AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 पाउंडाला घेतलेली एक अंगठीने बदलले नशीब! एका छोट्या खरेदीने सर्व काही बदलून टाकले; नेमकं काय घडलं?

ब्रिटनमधील एका महिलेने चॅरिटी शॉपमधून अवघ्या १ पाउंडला दिसायला साधी वाटणारी एक अंगठी विकत घेतली. मात्र, त्याच अंगठीने तिचं नशीब बदलून गेलं. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

1 पाउंडाला घेतलेली एक अंगठीने बदलले नशीब! एका छोट्या खरेदीने सर्व काही बदलून टाकले; नेमकं काय घडलं?
| Updated on: Nov 29, 2026 | 2:38 PM
Share

कधी कधी नशिबाचे दार अगदी अनपेक्षितपणे उघडते. एखादी छोटीशी खरेदी आयुष्यातील सर्वात मोठा खजिना ठरू शकते. असाच काहीसा अनुभव ब्रिटनमधील एका महिलेला आला. एका स्थानिक चॅरिटी शॉपमधून तिने अवघ्या १ पाउंडला (सुमारे १०० रुपये) एक अंगठी खरेदी केली होती. दिसायला अगदी साधी असल्याने तिने ती सामान्य फॅशन ज्वेलरी समजली. मात्र, तिच्या या स्वस्त खरेदीमागे शेकडो वर्षांचा इतिहास आणि लाखोंची किंमत दडलेली होती, याची तिला कल्पनाही नव्हती.

या अंगठीचं खरं रहस्य उलगडलं ते बीबीसीच्या लोकप्रिय ‘अँटिक्स रोडशो’ या कार्यक्रमात. महिला आपली अंगठी घेऊन या कार्यक्रमात पोहोचली होती. तिथे दागिन्यांचे तज्ज्ञ जॉन बेंजामिन यांनी अंगठीची तपासणी केली आणि तिचं ऐतिहासिक महत्त्व ओळखलं. महिलेने सांगितलं की, चॅरिटी शॉपमध्ये अनेक स्वस्त दागिन्यांमध्ये ही अंगठी तिला आवडली. डिझाइन छान वाटल्याने तिने फारसा विचार न करता ती विकत घेतली.

साध्या दिसणाऱ्या अंगठीत दडला होता मुगलकालीन इतिहास!

सुरुवातीला या अंगठीत काही विशेष असल्याचं जाणवत नव्हतं. मात्र, जॉन बेंजामिन यांनी अंगठी उलटी करून तिच्या मागील बाजूचं निरीक्षण केलं आणि त्यांचं लक्ष एका खास नक्षीकामाकडे गेलं. अंगठीच्या मागील बाजूस सूर्याच्या किरणांसारखी दिसणारी आकर्षक रचना होती. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचं नक्षीकाम १७९० ते १८०० या काळातील जॉर्जियन युगातील दागिन्यांमध्ये आढळतं. या एका खुणेमुळे अंगठीबाबतची उत्सुकता आणखी वाढली आणि तिची सविस्तर तपासणी करण्यात आली.

सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

तपासणीत समोर आलेल्या गोष्टींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही अंगठी तब्बल २२ कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आली होती. तिच्या मध्यभागी असलेला राखाडी रंगाचा, किंचित धूसर दिसणारा खडाही साधासुधा नव्हता. तपासणीनंतर तो अस्सल हिरा असल्याचं स्पष्ट झालं. तर हिऱ्याभोवती जडवलेले लाल रंगाचे छोटे खडे हे मौल्यवान माणिक म्हणजेच रुबी असल्याचं समोर आलं.

१ पाउंडची खरेदी ठरली लाखोंचा खजिना!

अंगठीच्या उत्कृष्ट कारागिरीचा आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर जॉन बेंजामिन यांनी ती भारतात तयार करण्यात आलेली ऐतिहासिक मुगलकालीन अंगठी असल्याचं सांगितलं. या दागिन्याचा संबंध मुगल साम्राज्याच्या समृद्ध कलाकुसरीशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या अंगठीची अंदाजित किंमत तब्बल २,००० पाउंड (दोन लाख रुपयांहून अधिक) असल्याचं सांगण्यात आलं.

विशेष म्हणजे, ज्या अंगठीसाठी महिलेने केवळ १ पाउंड खर्च केला होता, तिची किंमत त्यापेक्षा जवळपास २,००० पट अधिक निघाली. एका सामान्य खरेदीचं असं अनपेक्षित रूपांतर झाल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली.

या घटनेतून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे जुन्या वस्तूंच्या दुकानांमध्ये किंवा सेकंडहँड बाजारात अनेकदा इतिहासाचा एखादा अनमोल ठेवा अगदी सामान्य वस्तूच्या रूपात पडलेला असू शकतो. त्याची खरी किंमत ओळखणारी नजर मात्र असावी लागते. महिलेने केवळ आवड म्हणून घेतलेली एक रुपयांच्या आसपासच्या किमतीची वस्तू तिच्यासाठी लाखोंचा ऐतिहासिक खजिना ठरली. कधी कोणत्या जुन्या वस्तूत मौल्यवान इतिहास दडलेला असेल, हे सांगता येत नाही!

Follow Us
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!