World Coconut Day : केवळ खोबरेल तेलच नव्हे तर नारळपाणीही ठरते केसांसाठी फायदेशीर, केस होतात मजबूत

| Updated on: Sep 02, 2023 | 2:16 PM

नारळपाणी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तसेच ते आपल्या केसांसाठीही खूप फायदेशीर असते. त्यामुळे केसांची मुळं मजबूत होता.

World Coconut Day : केवळ खोबरेल तेलच नव्हे तर नारळपाणीही ठरते केसांसाठी फायदेशीर, केस होतात मजबूत
Image Credit source: freepik
Follow us on

Coconut water For Hair : नारळपाणी किंवा शहाळ्याचे पाणी पिणे (coconut water) हे आपले केस आणि त्वचा दोन्हींसाठी उत्तम ठरते. त्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्यामुळे नारळपाण्याचा वापर तुम्ही केसांसाठी (hair care) करू शकता. त्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. तसेच केस मजबूतही होतील. याच्या मदतीने तुम्ही तुमचे केस तुटण्यापासून वाचवू शकाल. नारळाच्या पाण्यामुळे केस लवकर वाढण्यासही मदत होते. केसांसाठी नारळाच्या पाण्याचा वापर कोणत्या प्रकारे करू शकता ते जाणून घेऊया.

शांपूसह नारळपाणी

त्यासाठी अर्धा कप नारळपाणी घेऊन त्यामध्ये तुमचा शांपू मिसळला. हे मिश्रण केसांसाठी वापरून केस स्वच्छ धुवा. यामुळे केस हेल्दी तसेच ,सॉफ्ट आणि चमकदारही राहतील.

केसांवर स्प्रे करा नारळपाणी

केसांसाठी तुम्ही नारळाचे पाणी वापरू शकता. स्प्रे असलेल्या बाटलीत नारळ पाणी भरून ठेवा. व ते अधूनमधून केसांवर स्प्रे करत रहा. यामुळे केस निरोगी व हेल्दी होतात.

नारळाचे पाणी व दही

नारळाचे पाणी आणि दही मिक्स करूनही केसांसाठी पेस्ट बनवू शकता. ही पेस्ट केस आणि स्काल्पवर काही वेळ लावा. यानंतर, काही मिनिटे स्काल्पला नीट मालिश करा. हे मिश्रण साधारण अर्धा तास असेच राहू द्यावे. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. दही आणि नारळाच्या पाण्याची पेस्ट आठवड्यातून एक किंवा दोनदा वापरू शकता.

नारळ पाणी व कोरफडीचे जेल

एका बाऊलमध्ये 2 चमचे कोरफडीचे जेल घ्या. त्यामध्ये 2 ते 3 चमचे नारळपाणी मिसळा. हे नीट मिक्स करून केसांवर लावा. त्यानंतर केसांना थोडा वेळा मालिश करा. अर्धा तास हे मिश्रण डोक्यावर राहू द्यावे. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)