Sangli Lok sabha result 2019 : सांगली लोकसभा मतदारसंघ निकाल  

| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

सांगली लोकसभा मतदारसंघ :  भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. येथे तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झाले होते. या मतदारसंघात भाजपाकडून खासदार संजय पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील अशी तिरंगी लढत होती. यंदा 2019 च्या निवडणुकीत येथे 65.38  टक्के मतदानाची नोंद झाली. […]

Sangli Lok sabha result 2019 : सांगली लोकसभा मतदारसंघ निकाल  
Follow us on

सांगली लोकसभा मतदारसंघ :  भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. येथे तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झाले होते. या मतदारसंघात भाजपाकडून खासदार संजय पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील अशी तिरंगी लढत होती. यंदा 2019 च्या निवडणुकीत येथे 65.38  टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीत 11 लाख 78 हजार 814 लोकांनी मतदान झाले होते. सांगली लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये एकूण 10 लाख 46 हजार 659 इतके मतदान झाले होते. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत  63.47 टक्के मतदान झाले होते. गेल्या वेळेच्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासंजयकाका पाटील (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीविशाल पाटील (स्वाभिमानी)पराभूत
अपक्ष/इतरगोपीचंद पडळकर (VBA)पराभूत

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक
महाराष्ट्रातील राजकीयदृष्या महत्त्वाचा जिल्हा म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा 2014 च्या मोदी लाटेत पहिल्यांदाच उधवस्त झाला. त्यावेळी भाजपचे उमेदवार संजय पाटील तब्बल सव्वा दोन लाख मतांनी विजयी झाले. त्यावेळी त्यांनी तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला.

2019 च्या सांगली लोकसभा निवडणुकीत विधानसभानिहाय  मतदानाची आकडेवारी

सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदार संघ येतात

1)   मिरज विधानसभा मतदारसंघात 2 लाख 9 हजार 18 इतके मतदान झाले. ( 64.48 टक्के )

2)  सांगली विधानसभा मतदारसंघात 2 लाख 2 हजार 158 इतके मतदान झाले. ( 63.02 टक्के )

3)  पलुस – कडेगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 86 हजार 404 इतके मतदान झाले. ( 67.72 टक्के )

4)   खानापुर  विधानसभा मतदारसंघात 2 लाख 7 हजार     61 इतके मतदान झाले. ( 64. 48 टक्के)

5)  तासगाव विधानसभा मतदारसंघात 2 लाख 4 हजार 57 इतके मतदान झाले. ( 69.85 टक्के )

6) जत विधानसभा मतदारसंघात 1 लाख 70 हजार 116 इतके मतदान झाले. ( 63. 10 टक्के )

यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य, कोणाकोणाच्या सभा?
2019 च्या या निवडणुकीत भाजपा उमेदवार खासदार संजय पाटील यांच्यासाठी भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची तासगाव येथे सभा झाली. तर  वीटा इथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली. शिवाय सांगली आणि जतमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली.

तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तासगाव येथे सभा झाली.

तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांची सांगली येथे सभा झाली. महत्त्वाचे म्हणजे सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमध्ये इतर पक्षांच्या झालेल्या सभेमध्ये  गोपिचंद पडळकर यांच्या सभेला सर्वात जास्त गर्दी होती. याठिकाणी तिरंगी लढत होत असली तरी सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा कुठे तरी बाजूला राहिला.