गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार; वळसे पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक, पहा काय म्हणाले गृहमंत्री?

| Updated on: Nov 14, 2021 | 12:03 PM

गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे गृहमंत्र्यांकडून कौतुक करण्यात आले आहे.

गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार; वळसे पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक, पहा काय म्हणाले गृहमंत्री?
Follow us on

मुंबई –  गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कारवाईबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले आहे. पोलिसांनी जीवाची बाजी लावत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले ही अभिमानाची गोष्ट आहे, त्यासाठी सर्व प्रथम मी पोलिसांचे अभिनंदन करतो असे त्यांनी म्हटले आहे.

मृतांमध्ये 6 महिला नक्षलवादी

पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, शनिवारी गडचिरोलीमध्ये झालेल्या चकमकीमध्ये पोलिसांनी 26 नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये सहा महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. 26 पैकी अद्याप काही नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला आहे. ही मोठी कारवाई असून, पोलिसांनी प्राणाची बाजी लावत ही मोहीम यशस्वी केली त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.

मिलिंद तेलतुंबडे कोण?

माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेची देशभरातील नक्षलवादी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास या नावाने ओळख असलेल्या हा माओवादी नेता गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत ठार झाला आहे. याबाबत गृहमंत्र्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मिलिंद तेलतुंबडे याचा अनेक कारवायांमध्ये सहभाग होता. तो माओवादी संघटनेच्या केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य देखील होता.  पोलिसांना तो अनेक प्रकरणामध्ये हवा होता. त्याची माहिती देणाऱ्याला 50 लाखांचा इनाम देण्याची घोषणा करण्यात  आली होती. अखेर तेलतुंबडे याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता उर्फ कविता ही बीएस्‌सी (मायक्रोबायॉलॉजी), एम्‌एस्‌सी (झुऑलॉजी), एम्‌ए (सोशॉलॉजी) आणि बीएड अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.

संबंधित बातम्या 

हृदयविकाराच्या धक्क्याने एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, कारवाईच्या भीतीने होता तणावात

Railway Recruitment 2021: ना परीक्षा ना मुलाखत, थेट दहावीच्या गुणांवर निवड, रेल्वेत 1785 जागांवर अप्रेटिंसची संधी