Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघात प्रकरणी 90 मिनिटे चौकशी, निष्कर्ष काय? मोठी अपडेट समोर

Ajit Pawar Plane Crash: 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती विमानतळाजवळ घडलेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी चौकशी सुरु आहे.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघात प्रकरणी 90 मिनिटे चौकशी, निष्कर्ष काय? मोठी अपडेट समोर
plane-crash
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 29, 2026 | 3:30 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला येत होते, पण विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच विमान क्रॅश झाले. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. आता या संदर्भात पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या सर्व पैलूंचा तपास केला जात आहे.

दरम्यान, अपघातात सहभागी असलेल्या लिअरजेट विमानाचे निर्माता बॉम्बार्डियरने अधिकृत निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, “बॉम्बार्डियरमध्ये आम्हाला या दुःखद घटनेचे खूप दुःख झाले आहे आणि आम्ही सर्व प्रभावित झालेल्यांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.”

सुमारे 90 मिनिटे चौकशी

पुढे ते म्हणाले की, “तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही या अपघाताच्या संभाव्य कारणांवर भाष्य करू शकत नाही. आम्ही तपास संस्थांना पूर्ण सहकार्य करू आणि आवश्यक असल्यास आमच्या शिफारसी देऊ.” दरम्यान, अपघाताची चौकशी करणारे एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) देखील सक्रिय झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, AAIB चे तीन सदस्य व्हर्सेस व्हेंचर्सच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी सुमारे 90 मिनिटे चौकशी केली. यावेळी कंपनीच्या मालकाशी आणि इतर अधिकाऱ्यांशी सविस्तर प्रश्नोत्तरे करण्यात आली. सध्या, अपघाताच्या कारणाबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष निघालेला नाही. तपास संस्थांनी त्यांचे अहवाल सादर केल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

नेमकं काय घडलं?

रुबाबदार नेते अजित पवार हे बारामती दौऱ्यावर निघाले होते. पहाटे मुंबईतून बारामतीला निघालेल्या अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमान आकाशात असताना स्फोट झाला. त्यानंतर विमान थोडे झुकले आणि विमानतळाच्या आधीच एका शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचे आणखी दोन-तीन स्फोट झाले. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या भीषण अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत विमानात असलेल्या इतर पाच जणांचेही निधन झाले आहे.

अपघातात कोणाचा मृत्यू?

अजित पवार: उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र.

विदिप जाधव: मुंबई पोलीस दलातील हवालदार आणि अजित पवारांचे पीएसओ (PSO).

कॅप्टन सुमित कपूर: विमानाचे मुख्य पायलट (PIC).

कॅप्टन शांभवी पाठक: को-पायलट (FO).

पिंकी माळी: फ्लाईट अटेंडंट.