सरपंच पदासाठी तृतीयपंथी उमेदवार, जाहीरनामा थेट स्टॅम्प पेपरवर…विरोधकांना घाम फोडणारे तृतीयपंथी कोण ?

आजही ग्रामीण भागातील बहुतांश पदाधिकारी महिला या नामधारी असतात. त्यांचे पती, भाऊ किंवा वडील हेच कारभारी असतात, त्यामुळे महिलांचे नेतृत्व दिसून येत नाही.

सरपंच पदासाठी तृतीयपंथी उमेदवार, जाहीरनामा थेट स्टॅम्प पेपरवर...विरोधकांना घाम फोडणारे तृतीयपंथी कोण ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Dec 15, 2022 | 1:03 PM

पंढरपूर : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या रविवारी मतदान पार पडणार आहे. मात्र, राज्यातील एका ग्रामपंचायतीची जोरदार चर्चा सुरू आहे. पंढरपूर येथील वेळापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची निवडणूक राज्यभर चर्चेत आली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत तृतीयपंथी असलेल्या माया अडसूळ यांनी उडी घेतली आहे. इतकंच काय तर अशिक्षित असलेल्या माया अडसूळ यांनी जिद्दीने ही निवडणूक लढविण्याचे ठरविले असून चक्का स्टॅम्प पेपरवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतच नाही संपूर्ण जिल्ह्यात माया अडसूळ आणि त्यांच्या जाहीर नाम्याची जोरदार चर्चा आहे. माया अडसूळ या अशिक्षित आहे, पण त्यांना गावचा विकास करायचा आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक कामांचा उल्लेख करत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. घरोघरी जाऊन प्रचार करणे, चौक सभा घेणे आणि मतदारांशी फोनवरून मतदान करण्याची विनंती करणे असे सध्या त्यांचे कार्य सुरू आहे.

आजही ग्रामीण भागातील बहुतांश पदाधिकारी महिला या नामधारी असतात. त्यांचे पती, भाऊ किंवा वडील हेच कारभारी असतात, त्यामुळे महिलांचे नेतृत्व दिसून येत नाही.

अशी परिस्थिती असतांना पंढरपूर येथील मळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तृतीयपंथी असलेल्या माया अडसूळ यांनी उडी घेतली आहे.

त्यातच त्या अशिक्षित आहे, पण गावचा विकास करायची त्यांची इच्छा आहे, त्याकरिता त्यांनी जाहीरनामा सादर करत असतांना शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपरचा आधार घेतला आहे.

माया अडसूळ यांनी जाहीरनाम्यात गावत बारा ठिकाणी मोफत वायफाय, शाळेला सोलर यंत्रणेद्वारे वीज पुरवठा, महिलांसह मुलींना विश्रांती गृह तयार करणार असल्याचे म्हंटले आहे.

आरोग्य केंद्रात 15 ऑक्सिजन बेडची व्यवस्था, विद्यार्थ्यांना वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र, जेष्ठ नागरिकांना आधार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हंटले आहे.