शेतकऱ्यांना 5 हजारांची तुटपुंजी मदत, मंत्री पाळीव कुत्र्यांना…; अभिजीत दिपकेंचा फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल

अभिजीत दिपकेंचा फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना केलेली 5 हजारांची मदत तुटपुंजी असल्याची टीका दिपकेंनी केली.

शेतकऱ्यांना 5 हजारांची तुटपुंजी मदत, मंत्री पाळीव कुत्र्यांना...; अभिजीत दिपकेंचा फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 11:30 AM

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर  फडणवीस सरकराने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिली आहे. परंतु शेतकऱ्यांना देऊ केलेली मदत तुटपंजी आहे, असं म्हणत अभिजीत दिपके यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाोबोल केला आहे. शेतकऱ्यांना 5 हजारांची मदतीपेक्षा मंत्री पाळीव     कुत्र्यांवर अधिक खर्च करतात, अशी टीका अभिजीत दिपकेंनी केली आहे.

अभिजीत दिपकेंनी महिला आरक्षावर मोठं भाष्य केलं. सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 50 टक्के तिकीट हे महिलांना द्यायला पाहिजे. दिपकेंनी यवतळमाळच्या दौऱ्यावर असताना हे भाष्य केलं. अभिजीत दिपके यांच्यासहित आशुतोष रांका देखील त्यांच्यासोबत होते. दिपके म्हणाले, ‘शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यामुळे सरकार किती असंवेदनशील असतं हे समजून येतं. शेतकऱ्यांनी विमा भरल्यानंतरही विम्याची रक्कम मिळाली नाही’.

Loading...

दिपके म्हणाले, काही शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 हजारांची घोषणा केली होती. आताच्या काळात 5 हजारांमध्ये काय होतं? मंत्री, आमदार, खासदार हे त्यांच्या पाळीव कुत्र्यांवर 5 हजारांहून अधिक खर्च करतात.  सरकारने दिलेल्या पाच हजारांवर किती महिने पुरतील?

सीजेपी नेत्याने पुढे म्हटलं की, एक-दोन महिन्यानंतर खायला काही शिल्लक राहणार नाही’. दिपकेंनी पुढे सांगितलं की, थोडी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. कमीत कमी त्यांना समजून घेतलं पाहिजे. तुम्ही कुत्र्यावर किती खर्च करता. त्यापेक्षा शेतकऱ्यांवर कमी खर्च करत आहात. आपण आता 2026 सालात जगत आहे, असे त्यांनी सांगितलं.

‘1972 साली महाष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्या काळात विज्ञानाने प्रगती केली नव्हती. त्यावेळी भारताकडे संसाधने देखील नव्हती. परंतु आता वैज्ञानिक प्रगती झाली असताना शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे  निसर्गावर अवलंबून राहावे लागणार असेल. तर आपण सरकारला का निवडून देतो? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. दिपकेंनी महिला आरक्षणावरही सवाल उपस्थित केला. महिलांसाठी आरक्षण 33 टक्क्यांपर्यंत का मर्यादित ठेवलं पाहिजे. देशात महिलांची संख्या अर्धी आहे. राजकीय पक्षांनी देखील आगामी निवडणुकीत महिलांना 50 टक्क्यांच्या आधारावर तिकीट वाटप केलं पाहिजे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us