अमरावती शिक्षक मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार ठरला? महत्त्वाची माहिती समोर, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसकडून तगडा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार ठरला? महत्त्वाची माहिती समोर, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
congress amravati
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 8:12 AM

येत्या काही महिन्यात अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या मतदारसंघातून काँग्रेस पक्ष हा आदिती पोहरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. यामुळे अमरावतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत प्राध्यापक आदिती पोहरे या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाकडून प्राध्यापक आदिती पोहरे यांना उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रा. आदिती पोहरे या माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत. प्रा. अदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. 6 डिसेंबर रोजी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लवकरच लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत आदिती पोहरे?

प्राध्यापक अदिती पोहरे या माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा वारसा लाभलाय. आदिती यांना लहानपणापासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणाचा अनुभव मिळाला आहे. त्यामुळे आदिती यांना विविध प्रश्नांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघातील त्यांची संभाव्य उमेदवारीची जोरदार चर्चा होत आहे. अदिती यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही चांगली आहे. त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. स्ट्रक्चरल डिझाईन हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. मानसशास्त्र हे शिक्षणही पूर्ण केलंय.
त्यापूर्वी त्यांनी विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी फोर्ट कॉन्व्हेंट, मुंबई आणि होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल अमरावती येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us