मतदार यादीतून नगरसेवकांचीच नावं गायब, ‘टीव्ही 9’च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

पालघर : पालघर नगरपरिषदेची आगामी निवडणूक तोंडावर असताना मतदार यादीतून नगरसेवकांची नावे गहाळ झाल्याचा प्रकार घडला होता. त्याची तक्रार नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने केलेल्या बातमीची दखल प्रशासनाने घेतली असून मतदार याद्यांमधून वगळलेली नावे पुन्हा मतदार यादीमध्ये टाकण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहेत. यासाठी आजी-माजी नगरसेवकांनी टीव्ही 9 मराठीचे आभार मानले आहेत. पालघर नगरपरिषदेची …

मतदार यादीतून नगरसेवकांचीच नावं गायब, ‘टीव्ही 9’च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

पालघर : पालघर नगरपरिषदेची आगामी निवडणूक तोंडावर असताना मतदार यादीतून नगरसेवकांची नावे गहाळ झाल्याचा प्रकार घडला होता. त्याची तक्रार नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने केलेल्या बातमीची दखल प्रशासनाने घेतली असून मतदार याद्यांमधून वगळलेली नावे पुन्हा मतदार यादीमध्ये टाकण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहेत. यासाठी आजी-माजी नगरसेवकांनी टीव्ही 9 मराठीचे आभार मानले आहेत.

पालघर नगरपरिषदेची आगामी निवडणूक जवळ आली असताना नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवकांची नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. काही विशिष्ट लोकांकडून राजकीय अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने सायबर क्राईमचा वापर करत नावे गहाळ करण्यात आल्याचं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी सांगितले. याबाबत तहसीलदारांना तक्रार करण्यात आली होती.त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने ही नावे वगळण्यासाठी सांगितल्याचे तपासात समोर आले.

या मतदार यादीतून राष्ट्रवादीची नगरसेविका श्वेता पाटील, शिवसेनेचे नगरसेवक जितेंद्र पा. माळे, माजी नगरसेवक भावानंद संखे इत्यादींची नावे वगळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे आम्हाला मतदानापासून वंचित ठेवून लोकशाहीचा खून करण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. या बातमीची दखल   सर्वप्रथम tv9 मराठीने घेतली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. मतदार यादीतून नावं वगळण्याचं जे कारस्थान चालू होतं, त्याला आता विराम लागला आहे. असे तिन्ही आजी माजी नगरसेवकांनी सांगितले आहे. या तिघांचीही नावं मतदार यादीत सामाविष्ट करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याने, तिन्ही आजी माजी नगरसेवकांनी tv9 मराठी चे आभार मानले आणि tv9 मराठी खरोखरचं मराठी माणसांच्या हक्कासाठी  लढणारी वृत्तवाहिनी आहे असे सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *