माझे पती माझ्यासोबत शारीरिक… प्रोफेसरच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट, प्रकरणात नवीन ट्वीस्ट

आग्रा येथील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातील प्रोफेसर गौतम जैसवार यांच्यावर पीएचडी विद्यार्थिनीने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन शोषण केल्याचा दावा तिने केला असून, प्रोफेसरला अटक झाली आहे.

माझे पती माझ्यासोबत शारीरिक... प्रोफेसरच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट, प्रकरणात नवीन ट्वीस्ट
Gautam Jaiswar agra
| Updated on: Nov 07, 2025 | 3:46 PM

उत्तर प्रदेशातील आग्र्यातील एक प्रोफेसर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रतिष्ठित प्रोफेसर गौतम जैसवार यांच्यावर काही विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे ते सध्या चर्चेत आहेत. त्यांच्यावर एका पीएचडी विद्यार्थिनीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन दोन वर्षांपर्यंत शारीरिक शोषण आणि वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आता या वादात प्रोफेसरची पत्नी कविता जैसवार यांनी उडी घेतली आहे. माझा नवरा निर्दोष आहे, असा दावा पत्नी कविता जैसवार यांनी केला आहे. नुकतंच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

गेल्या २६ ऑक्टोबर रोजी एका पीडित विद्यार्थिनीने न्यू आग्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसात तिने आरोप केला की, प्रोफेसर जैसवार हे विवाहित आहेत. मात्र त्यांनी मी माझ्या वैवाहिक जीवनात खूश नाही असे मला सांगितले होते. त्यासोबतच मला लग्नाचे आश्वासन देत या काळात माझे शोषणही केले. २५ ऑक्टोबर रोजी प्रोफेसरने मला कार्यालयात बोलावले आणि मला मारहाण केली. तसेच माझा मोबाईल तोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्या पीडित विद्यार्थिनीने केला आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी प्रो. जैसवार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानंतर ५ दिवसांनी आरोपी प्रोफेसरला वाराणसीतून अटक करण्यात आली. तो सध्या तुरुंगात आहेत. विशेष म्हणजे, उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी त्यांना नुकताच कुलाधिपती आनंदी बेन पटेल यांच्या हस्ते ‘बेस्ट टीचर रिसर्च’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या घटनेनंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांना तत्काळ निलंबित केले आहे.

पत्नी कविता काय म्हणाल्या?

पती तुरुंगात गेल्यानंतर आता त्यांची पत्नी कविता यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माझे पती माझ्यासोबत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूश आहेत, मग ते दुसऱ्या मुलीकडे कशाला जातील? असा सवाल त्यांच्या पत्नीने केला आहे. ती विद्यार्थिनी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे घरी येत-जात होती. तिला प्रोफेसर विवाहित असल्याचे पूर्ण ज्ञान होते. माझ्या पतीला स्किन सोरायसिस हा त्वचारोग आहे. त्यावर उपचार म्हणून ती विद्यार्थिनीच त्यांना खजुराहो आणि बरसानाला घेऊन गेली होती. पतीनेच मला ही सर्व माहिती दिली होती. त्यामुळे फसवणुकीचा प्रश्नच नाही. प्रोफेसर जैसवार अनेक गरजू विद्यार्थ्यांची आर्थिक मदत करायचे. त्यांनी या विद्यार्थिनीचे एलआयसीचे हप्ते भरून मदत केली होती, असा दावा कविता यांनी केला आहे.

माझे पती निर्दोष आहेत. हे त्यांच्याविरुद्ध रचलेले षडयंत्र आहे. माझ्याकडे त्या विद्यार्थिनीचे काही चॅट रेकॉर्ड्स आहेत. ते मी कोर्टात सादर करेन. यामुळे माझ्या पतीला खोट्या आरोपांमध्ये फसवले गेले आहे, असे कविता यांनी म्हटले आहे. दरम्यान सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून ते न्यायप्रविष्ठ आहे.

Follow Us