जेवढी मदत करायची होती तेवढी केली, अजित पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

आज शिवजयंतीनिमित्त (Shivjayanti) अजित पवार बोलत असताना अजित पवारांची भावनिक बाजू पुन्हा समोर आली. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना (St worker Strike) आज भावनिक आवाहन केलं आहे.

जेवढी मदत करायची होती तेवढी केली, अजित पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन
अजित पवारांचं भावनिक आवाहन
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 6:55 PM

पुणे : आज सकाळीच आपण पुन्हा आक्रमक बेधडक अजित पवार (Ajit Pawar) बघितले आहेत. मात्र हेच अजित पवार कधी काळी भरल्या पत्रकार परिषदेत रडतानाही बघितले आहेत. अजित पवारांचा कामचा धडाका आणि सकाळी लवकर काम सुरू करण्याची शिस्त सगळ्यांनाच अवगत आहे. आज शिवजयंतीनिमित्त (Shivjayanti) अजित पवार बोलत असताना अजित पवारांची भावनिक बाजू पुन्हा समोर आली. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना (St worker Strike) आज भावनिक आवाहन केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीकरणाचा मुद्दा तापला आहे. यावरून राज्य सरकारने सतर्क होत ऐतिहासिक पगारवाढही केली मात्र तरीही संपाचा मुद्दा पूर्ण निकालात निघाला नाही. आता हे प्रकरण कोर्टात आहे. यावर बोलताना एसटी कर्मचाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, जेवढी काय मदत करायची होती ती केली आहे, विलीनीकरणाचा कोर्टात अहवाल गेला आहे, जो काही निर्णय येईल तो मान्य करावा लागेल. मात्र गरिबांच्या मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी एसटीची गरज आहे. आता कुठेतरी हे संपाचं हत्यार थांबलं पाहिजे, असे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी भावनिक आवाहन केलं आहे.

निवडणुका झाल्यावर नेते कुठे जातात?

तसेच विरोधकांना टोला लगावताना, निवडणुका जवळ आल्या की 50 जण येतात, आणि पाण्याचं प्रश्न अजून मिटला नाही, असं काही जण म्हणत असतात, मात्र निवडणुका गेल्या की कुठे गायब होतात तेच कळत नाही. मात्र पाण्याचाही प्रश्न आता मिटवला आहे. त्यांच्याकडे आता मुद्दा ठेवला नाहीये, असा टोला अजित पवारानी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना नाव न घेता लगावला आहे. तसेच कोरोनाचे सावट कमी झालं की मुख्यमंत्र्यांशी बोलून टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्याचा आम्ही प्रयन्त करणार आहोत, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.

शरद पवारांसमोर काय शब्द दिला?

पुण्यातल्या विकास कामांबद्दल बोलताना, सुपा-परगणा या भागात नवीन विमानतळ मिळणारच आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झालं आहे, मात्र ती काढावी लागतात. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, असे आवाहनही अजित पवारांनी केले आहे. तसेच हे सर्व करत असताना कुणाची गैरसोय होणार नाही, हा शरद पवारांच्या समोर शब्द देतो, म्हणत त्यांनी स्थानिकांना आश्वस्त केले आहे. पगारासाठी दर महिन्याला आपण 14 ते 15 हजार कोटी रुपये खर्च करत असतो. करोनात घरी असणाऱ्याच्या पगारात कपात केली नाही, केंद्राने आणि राज्याने मदत केली, असेही अजित पवारांनी सांगितलं आहे.

एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक श्रेय घेतात; फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Video | खासदार संभाजीराजेंच्या गाडीचं स्टेअरींग महिलेच्या हाती! Viral व्हिडीओमागचा इंटरेस्टिंग किस्सा

ठरलं! एकमेकांच्या विरोधात जायचं नाही, बोलायचं नाही, ठाणे, केडीएमसी, पालघरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार?