Marathi News » Photo gallery » BJP and NCP leaders join Shiv Sena in Pune in the presence of Aditya Thackeray
पुण्यात भाजप, राष्ट्रवादीला शिवसेनाचा धक्का, अर्धा डझन नेत्यांच्या हाती शिवबंधन
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, भाजपचे अमोल शिंदे, सरपंच, वातुंडे, सुखदेव मांडेकर, सरपंच, राष्ट्रवादी, गणेश मांडेकर, उपसरपंच, राष्ट्रवादी या साऱ्यांचा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
पुण्यात शिवसेनेतलं इनकमिंग सध्या वाढलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या तोंडावर अनेकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हाती बांधलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे सर्व प्रवेश पार पडले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे पारडं जड ठरणार आहे. आदित्य ठाकरेंनीही तशीच हाक दिली आहे.
1 / 6
स्वातंत्र्यातलं सगळ्यात मोठं तंत्र आपल्या हातात लोकतंत्र आहे. आपल्या हातात जे माध्यम आहे त्यातून देशसेवा करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, भाजपचे अमोल शिंदे, सरपंच, वातुंडे, सुखदेव मांडेकर, सरपंच, राष्ट्रवादी, गणेश मांडेकर, उपसरपंच, राष्ट्रवादी या साऱ्यांचा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
2 / 6
यात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे अमोल शिंदे. वातुंडे, गावाचे सरपंच आहे. कारण त्यांच्याविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते. गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्यातील टोळी युद्धाने मुळशी तालुका बदनाम झाला आहे. त्याची झळ पुणे शहरालाही अनेकदा बसली असून मुळशीची गुन्हेगारी हळूहळू सरकत पुणे शहरात आली.
3 / 6
तर 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांनी प्रवेश केला होता. त्यामुळे हे प्रवेश चर्चेत आहेत. यामुळे अनेकदा राजकीय टीका होताना दिसून येते.
4 / 6
माझ्यावरचे सर्व गुन्हे हे 2010 सालीच निल झालेत. या सर्व गुन्ह्यात माझी निर्दोष मुक्तता झालीय. हाणामारी, खंडणी आणि खुनाचे गुन्हे होते. 2010 नंतर माझ्यावर एकही गुन्हा नाही.विरोधक आत्ता मी गुन्हेगार असल्याचा आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी अमोल शिंदे यांनी दिली आहे.
5 / 6
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसेल. महापालिका निवडणूक एकट्याने लढायची की आघाडी करायची याचा निर्णय आत्ताच घेता येणार नाही, असे सूचक विधान यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच किरीट सोमय्या, नारायण राणे यांच्या आरोपांना किती महत्व द्यायचे हे आपण ठरवायचं, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.