Video : विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’ पाहा अजित पवारांची बेधडक स्टाईल…

| Updated on: Dec 24, 2021 | 4:01 PM

अजित पवारांनी एवढा स्फाट काय करतो विधानसभेत? विधानसभेत 'झोपा काढता का रे?' असा रोखठोक सवाल विचारल्याने काही काळ वातावरण पुन्हा तापल्याचे पहायला मिळाले.

Video : विधानसभेत झोपा काढता का रे? पाहा अजित पवारांची बेधडक स्टाईल...
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाखडी सुरू आहे, अशातच अजित पवारांनी एवढा स्फाट काय करतो विधानसभेत? विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’ असा रोखठोक सवाल विचारल्याने काही काळ वातावरण पुन्हा तापल्याचे पहायला मिळाले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सभागृहाची प्रश्नपत्रिका न मिळाल्याने सदस्य भडकले. यावेळी अजित पवारांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. अजित पवारांना आपण अनेकदा बेधडक बोलताना बघितले आहे. अजित पवार भर सभेत विरोधकांना थेट आव्हान देणारे नेते म्हणून ओळखले जातात. इतकेच काय अजित पवार त्यांच्याच सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही अनेकदा शाळा घेतात, हे आपण अनेकदा पाहिले आहे, याच अजित पवारांचे हे आक्रमक रुप आज पुन्हा सभागृहाने पाहिले आहे.

विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’

प्रत्येक दारामध्ये तुम्ही लोक उभे करता, त्यावेळी आत आमदार आल्यानंतर त्यांच्या हातात गठ्ठा द्या, काम होऊन जाईल असे म्हणत अजित पवारांनी कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. सदस्यांच्या वेदना बरोबर आहेत, त्याचे काय चुकीचे आहे? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. तसेच पुढील कामकाजाबाबतही अजित पवारांनी काही बदल सुचवले, त्याला नरहरी झिरवळ यांनीही संमती दर्शवली आहे.

विजय वडेट्टीवारही मध्यस्तीला धावले

कोरोनामुळे सध्या विधानसभेच्या अधिवेशनाचा कालवधी कमी ठेवण्यात आला आहे. जेव्हापासून कोरोना आला आहे, तेव्हापासून प्रत्येक वेळी अधिवेशनचा कालावधी कमी करण्यात आला आहे. एक तर सात दिवसाचे अधिवेशन असते, मग एवढा स्टाफ झोपा काढतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला, त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मध्येस्थी करत अजित पवारांचे बरोबर असल्याचे सांगत सदस्यांच्या भावनांचा विचार करावा अशी विनंती केली. त्या सदस्याच्या मतदारसंघातीलच नव्हे तर प्रश्न कुठलाही असेल तर त्यात सहभागी होण्याचा अधिकार सर्वांना आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर आम्ही सर्वांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत, पुन्हा रविवारी आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी आरटीपीसीआर टेस्ट करायला सांगितली आहे, ती करणार आहोत, त्यानंतरच आम्हाला प्रवेश मिळणार आहे, असेही सांगितले. तसेच सोमवार मंगळवारी संदस्यांना जवळ बसता येईल असे अजित पवारांनी सुचवले, त्यानंतर सर्वांची हरकत नसेल तर तसे करू, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली.

VIDEO: वैभव खेडेकर काय तुमचे जावई आहेत का?; रामदास कदम यांचा आपल्याच सरकारला थेट सवाल

Pune crime| बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्याला सिंहगड पोलिसांनी केली अटक

Year Ender 2021 : व्हिडिओज् आणि फोटोंमधून ‘या’ सोशल मीडिया स्टार्सनी केलं मनोरंजन